बहुगुणी धने-जिरेपूड हे शरिरासाठी योग्यच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019
  • रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठीही ही पूड लाभदायक आहे. रक्तदाब, अर्धांगवायू, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांवर धने-जिरेपूडीचे सेवन परिणामकारक ठरते.

आपल्या भारतीय आहारपद्धतीत विविध औषधी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. ते आरोग्याला फायदेशीर आहेत. धने-जिरेपूड ही त्यापैकीच एक. तिचे आरोग्याला पचनासह इतरही फायदे आहेत.

प्रत्येकी १०० ग्रॅम धने आणि जिरे तव्यावर गरम करून घ्यावेत. त्यानंतर, मिक्सरमध्ये जाडीभरडी पूड करून घ्यावी. पावडर करू नये. ही पूड नाश्ता, जेवणामध्ये भाजी, ताक आदींमधून एकदोन चमचे घ्यावी.नियमितपणे आहारात धने-जिरेपुडीचा समावेश केल्याने पोट साफ होण्यास मदत मिळते. शरीर हलके होते.शरीरावरील चरबीही कमी होते.

त्यामुळे वजन नियंत्रणात येते. अशक्तपणा कमी होऊन उत्साह वाढतोरक्तातील अनावश्यक कण विरघळविण्यासाठीही धने-जिरेपूड फायदेशीर आहे. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठीही ही पूड लाभदायक आहे. रक्तदाब, अर्धांगवायू, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांवर धने-जिरेपूडीचे सेवन परिणामकारक ठरते. अनेक आजारांवर ही पूड फायदेशीर असली तरी ती उपचार व औषधांना पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे औषधे सुरू ठेवत ही पूड पूरक म्हणून वापरावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News