वेटलिफ्टिंगमध्ये मुकुंद आहेरची सुवर्णकामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

खेलो इंडिया स्पर्धेत ४९ किलो वजनगटात त्याने १८४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सध्या तो भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पटियाला येथे भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सराव करत आहे.

मनमाड : वजनदार खेळ असलेल्या वेटलिफ्टिंगमध्ये गुरुवारी मनमाडचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकले. येथील मुकुंद आहेर याने गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगचे सुवर्णपदकप्राप्त करणारा 

मुकुंद जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला. मुकुंदला प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व एनआयएस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले.
गरीब-मध्यमवर्गीय कुटुंबातील छत्रे विद्यालयात शिकणारा जय भवानी व्यायामशाळेचा खेळाडू असलेल्या मुकुंदने परिस्थितीवर मात करत खेलो इंडियाची शिष्यवृत्ती मिळविली. शिष्यवृत्तीमुळे लागलेला हातभार आणि श्री. व्यवहारे यांचे मार्गदर्शन यामुळे मुकुंदने संधीचे सोने केले.

खेलो इंडिया स्पर्धेत ४९ किलो वजनगटात त्याने १८४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सध्या तो भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पटियाला येथे भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सराव करत आहे. दरम्यान, मुकुंदच्या दोन बहिणी वीणा आहेर आणि मेघा आहेर यादेखील वेटलिफ्टिंग खेळाडू असून, व्यवहारे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News