जगातील पाच श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी 'या' क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

गुंतवणुकीचा वर्षाव आणि नवनव्या डिजिटल उपक्रमांमुळे चर्चेत आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज दोन हजार रुपयांची उच्चांकी पातळी ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला

मुंबई: गुंतवणुकीचा वर्षाव आणि नवनव्या डिजिटल उपक्रमांमुळे चर्चेत आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज दोन हजार रुपयांची उच्चांकी पातळी ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला. दरम्यान, कंपनीचे बाजार भांडवलीमूल्य वाढल्याने कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरभावाने आज रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आणि मुंबई शेअर बाजार बंद होतेवेळी हा शेअर रुपयांवर स्थिरावला. आदल्या दिवशीच्या तुलनेत त्यात . रुपयांची वाढ झाली. मार्चमध्ये शेअर बाजार जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळला होता, त्यावेळी या शेअरचा भाव . रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. तेव्हापासून अवघ्या चार महिन्यांत त्यात तब्बल टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली.

विक्रमी बाजार भांडवलीमूल्य
या कंपनीने बाजार भांडवलीमूल्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीमूल्याचा टप्पा या कंपनीने आता ओलांडला आहे. आज तिचे बाजार भांडवलीमूल्य . लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. असा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

मुकेश अंबानींची आगेकूच
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. "फोर्ब्स'च्या यादीनुसार, अंबानी यांनी सहाव्या स्थानावरून आगेकूच करीत आता पहिल्या पाचांत स्थान मिळविले आहे. त्यांनी आता जगप्रसिद्ध गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, अंबानी यांची संपत्ती बुधवारी . अब्ज डॉलरने वाढली आणि ती एकूण अब्ज डॉलर (सुमारे . लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.

जगातील टॉपच्या पाच श्रीमंत व्यक्ती

  • जेफ बेझोस (अमेझॉनचे संस्थापक-सीईओ) 
  •  बिल गेट्‌स (मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक) 
  •  बर्नार्ड आर्नो (लुई वित्तोंचे अध्यक्ष) 
  • मार्क झुकरबर्ग (फेसबुकचा सहसंस्थापक-सीईओ)
  • मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष) 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News