मुग्धाचं कमबॅक 

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 11 February 2019

‘फॅशन’, ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या हिंदी चित्रपटात मुग्धा गोडसे झळकली. ‘फॅशन’मधील तिची कामगिरी विशेष उल्लेखनीय होती. मात्र बराच काळ मुग्धा हिंदी चित्रपटांकडे फिरकलीच नाही.

आता बऱ्याच वर्षांनंतर ती बॉलीवूडमध्ये कमबॅक करतेय. ‘शर्माजी की लग गई’ या कॉमेडी चित्रपटात मुग्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. मुग्धाबरोबरच कॉमेडी किंग कृष्णा अभिषेक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

मनोज शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केलं आहे. तिने याआधीही कॉमेडी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय छोट्या पडद्यावरील अनेक रिॲलिटी शोमध्येही तिचा सहभाग होता.

‘शर्माजी की लग गई’मध्ये तिचा कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शिवाय कृष्णाबरोबर कॉमेडी चित्रपटात काम करणं तिच्यासाठी आव्हानात्मकच असेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News