महेंद्र सिंग धोनीच सर्वोत्तम कर्णधार - सुरेश रैना 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020
  • आगामी आयपीएल स्पर्धेत धोनी हा आपल्या कामाची चुणूक दाखवून देईलच अशा आशयाचे विधान सुरेश रैनाने धोनीविषयी केले. 

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील  सर्वोत्तम कर्णधार हा महेंद्रसिंग धोनीचं असल्याचे परखड मत टीम इंडियाचा फलंदाज  सुरेश रैना यानी मांडले आहे. महेंद्रसिंग धोनी हा जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी  एक असून उत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.

भारतीय क्रिकेट संघाला २०१९ च्या  विश्वचषक स्पर्धेमध्ये हवीतशी साजेशी अशी  कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे भारतीय संघ हा काही कालावधीतच विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. त्यादिवसापासून आजपर्यंत महेंद्रसिंग धोनीला एकदिवसीय सामन्यापासून विश्रांती देण्यात आली आहे. परंतु आगामी आयपीएल स्पर्धेत धोनी हा आपल्या कामाची चुणूक दाखवून देईलच अशा आशयाचे विधान सुरेश रैनाने धोनीविषयी केले.

तसेच महेंद्र सिंग धोनी हा सर्वोत्तम  यष्टिरक्षकांपैकी एक असल्याचे मतदेखील त्याने ह्यावेळी मांडले. आगामी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघाला धोनीमुळे उत्तम असे यश संपादन करता येईल असेही  रैना म्हणाला. चेन्नई सुपरकिंग्स  हा संघ आगामी आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात नक्कीच विजय मिळवेल अशा आशयाचे मत सुरेश रैनानी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले.

त्यामुळे आता आगामी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स धोनीच्या नेतुत्वात कशी कामगिरी करतो हे पाहणे आता महत्वाचं  ठरणार आहे  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News