श्री. संजीव पेंढरकर यांना आय.पी.ई.आरचा 'आऊटस्टॅण्डिंग परफॉर्मन्स ॲवॉर्ड' घोषित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 February 2019

श्री. संजीव पेंढरकर यांना आयपीईआरचा आऊट आउटस्टँडिंग  परफॉर्मन्स ॲवॉर्ड  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेत्या मायक्रोबायोलॉजिस्टचा सन्मान करण्यासाठी श्री. संजीव पेंढरकर, संचालक, विको लेबॉरेटरीज यांना विल्यान महाविद्यालयात प्रामुख पाहूणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या भाषणात, प्रमुख पाहुण्यांनी उत्पादनाचे डिझाईन आणि उत्पादनात मायक्रोबायोलॉजिस्ट तज्ञाचे कौशल्य, भुमिका आणि उत्पादनाचा दर्जा विशद करून सांगीताला. हा पुरस्कार समारंभ २३ फेब्रुवारी २०१९ रोजी विल्यान महाविद्यालयात, मुंबई येथे आय. पी. ई. आर विल्यान डिप्लोमा पुरस्कार वितरणासाठी आयोजित करण्यात आला होता. 
  
श्री. संजीव पेंढरकर यांना आयपीईआरचा आऊट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ॲवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मायक्रोबायोलॅाजीचे एचओडी डॉ. अरुणा के, विल्यान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॅा. आशिष उझगरे, महेश बुरांडे, श्री. समीर बुरांडे, सौ. मोनिषा बुरांडे, आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आय. पी. ई. आर. च्या 'आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ॲवॉर्ड' २०१८-१९ डिप्लोमा ॲवॉर्ड समारंभात त्यांनी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला. यास भरभरून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तिमत्व विकास करावा आणि तज्ञ बनण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासंबंधीच्या श्री. पेंढरकर यांनी दिलेल्या बहुमूल्य सल्ल्याचे स्वागत करण्यात आले आणि त्याची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली. 

श्री. संजीव पेंढरकरांचा जन्म उद्योजकांच्या कुटुंबात झाला आणि ते विको लेबॉरेटरीजमध्ये तरुण वयातच दाखल झाले. तेव्हापासून आपली उद्योजकीय कौशल्ये वाढविण्यास सुरुवात केली. अत्यंत घनिष्ट नातेसंबंध जोपासणाऱ्या व्यावसायिक कुटुंबात ते वाढले आणि अशाप्रकारे व्यवसायाची भरभराट आणि त्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याशी संलग्न 'संभाषण व रणनीतींशी' त्यांचा सुपरिचय  झाला. परिणामस्वरूप, विको एक विश्वस्तरीय संस्था बनावी या स्वप्नाने झपाटून त्यांनी अथक परिश्रमास सुरुवात करावी यात नवल कसले? या प्रवासात अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले त्यामुळे ते अधिक कणखर, महत्वकांक्षी आणि चाणाक्ष बनले. प्रेक्षकांत विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आपल्या या प्रवासातील अनुभव ठेवले. त्यांचे हे वर्णन प्रेरणादायी ठरले. विल्सन महाविद्यालय, गिरगाव, मुंबई येथील आपल्या भाषणात तरुण मायक्रोबायोलॉजीस्टना त्यांनी अनेक अमूल्य सूचना देखील दिल्या. 

यानंतर श्री. पेंढरकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांची भूमिका समजावून सांगितली. मायक्रोऑरगॅनिझम आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव करतात व ते मानवजातीस कसे उपयुक्त ठरू शकतात, हे समजण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. सतत वाढणारी प्रदूषणाची पातळी आणि ती कमी करण्यात बायोडिझेलसारख्या जैविक इंधनाच्या अल्गेची भूमिका व त्यामुळे मानवजातीस वरदान ठरू शकणारी वाढवाणी प्राणवायूची पातळी यावर सविस्तर चर्चा केली. अल्गेच्या उत्पादन खर्चात घाट करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांत अनेक सरकारी संस्था आर्थिक सहाय्य देऊन सहभागी होत आहेत. यामुळे अल्गे इंधनाचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन शक्य होऊ शकेल. मोठ्या प्रमाणात अल्गेची निर्मिती करून बायोइथेनॉल, बायोडिझेल, बायोब्युटिनॉल, बायोमिथेनॉल आणि इतर बायो इंधनांचे उत्पादन करता येईल. म्हणूनच मायक्रोबायोलॉजिस्टनी अल्गेच्या उपयुक्ततेची व्याप्ती वाढविण्यावर आणखी प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यात खऱ्या अर्थाने त्यांना प्रचंड वाव आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News