श्री आर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटर रुग्णसेवेसाठी तत्पर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

श्री ओर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे डॉ. देवेगौडा इमगौडा व त्यांच्यासोबत असलेले डॉक्‍टरांचे पथक रुग्णांची सेवा करण्यात स्वतःला झोकून देत आहे.

कॉलेज रोडवरील गांधी भवनजवळ असलेल्या सुसज्ज इमारतीत कार्यरत असलेले श्री ओर्थो आणि ट्रॉमा सेंटरमध्ये रुग्णांवर तातडीने आणि कमी दरात उपचार केले जातात. केवळ वैद्यकीय उपचारच न करताना या सेंटरने सामाजिक कार्यातही आघाडी घेतली आहे. रुग्ण आणि सेंटर यांच्यातील नाते दृढ झाले असून केवळ विश्वासाच्या जोरावर सेंटरने तिसऱ्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे.
-डॉ. देवेगौडा इमगौडा

श्री ओर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे डॉ. देवेगौडा इमगौडा व त्यांच्यासोबत असलेले डॉक्‍टरांचे पथक रुग्णांची सेवा करण्यात स्वतःला झोकून देत आहे. रुग्णांची सुरक्षितता आणि त्यांना बरे करण्याकरीता एनएबीएच मान्यतेसाठी शुल्करहित सुविधा असलेले रुग्णालय ऑर्थोपेडिक ट्रॉमा सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी आहे. २४ बाय ७ तासाच्या धर्तीवर तातडीची सेवा, वैद्यकीय उपचार, हायटेक लॅब, अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, डिजिटल एक्‍स-रे, एसीजी, १० बेडच्या आयसीयू घटकाची या रुग्णालयात सोय आहे.

अपघाताची प्रकरणे तसेच गुन्ह्याच्या कृत्यात जखमी झालेल्या व्यक्तींनाही येथे दाखल करून घेऊन त्यांना उपचार देण्यात येतात. हात-पाय मोडलेल्यावर शस्त्रक्रिया, सांधेदुखी, कृत्रिम अवयवांच्या जोडणीवर उपचार, की-होल शस्त्रक्रिया, पोलिओ आणि मुलांच्या अपंगत्वावर उपचार, पेडियॉट्रिक ओर्थोपेड्‌नीस आणि शरीरातील अवयवांच्या व्याधीवर उपचार, संधिवात आणि हातापायावरील दुर्बलतेवर उपचार, स्पोर्टस मेडिसिन, पाठदुखीवर शस्त्रक्रियेचे उपचार आणि मेंदू आणि नाडीवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

सामान्य मेडिसिन, रेस्पिरेटरी मेडिसिन, सामान शस्त्रक्रिया, लेप्रॉस्कोपी, कान, नाक आणि घसा विभाग, मूत्ररोग, कॅन्सरवर शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, फेशियल सर्जरी, स्त्री रोगावर उपचार आणि भूल देण्याच्या सुविधाही रुग्णालयात आहेत. आता या इस्पितळात फिजिओथेरपी आणि रिहॅबिलीटेशन केंद्रामध्ये प्रगत लेझर शॉकव्हेव थेरपी आणि मॅग्नेटीक थेरपी सुरू करण्यात आली आहे. 

विविध योजना उपलब्ध
आरोग्य विमा योजनेतील आरोग्यभाग्य, आयुष्यमान भारत, कर्नाटक बीएसएनएल नोकरी योजना, विदाल हेल्थ, चोला पंदलप, अपोलोमुनिच, स्टार हेल्थ, बजाज अलायन्स आणि आयसीआयसीआय लोंबार्ड योजना येथे उपलब्ध आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News