MPSCसाठी विद्यार्थ्यांचे उपोषण; तरुणांनी घेतला मोठ्या प्रमाणात सहभाग

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Monday, 2 March 2020

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी अलका टॉकीज चौक येथील केळकर पुतळ्याजवक आज एक दिवसीय लाक्षणीक उपोषणाला सुरुवात केली.

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी राज्य सरकारला अनेक वेळा विनंती अर्ज करुनही सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी अलका टॉकीज चौक येथील केळकर पुतळ्याजवक आज एक दिवसीय लाक्षणीक उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 

मोठी बातमी-  ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध; सोशल मी़डियावर करणार अनोखे आंदोलन

सर्व विभागाच्या ऑनलाईन परीक्षा घेणारे महापोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व विभागांनी स्वतंत्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागण्यासाठी पुर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होईल अशी शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. संपुर्ण परीक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्यात याव्यात, अशी मागणी 'एमपीएससी स्टुडेंट्स राईट्स्' आणि 'एमपीएससी समन्वय समिती'ने सरकारला केली होती. मात्र, सरकारने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षा संघटना आणि विद्यार्थ्यांनी एक दिवशीय उपोषण करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचा-  MPSC परीक्षेसाठी तरुणांनी घातले चक्क छत्रपतींना साकडे

अनेक वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत, मात्र सरकारने महाभरतीला स्थगिती दिल्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय देखील वाढत असल्याने काही वर्षांनी परीक्षेसाठी असणारी वयाची अट त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे सरकारने नोकर भरतीला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. तरुणांनी आतापर्यंत महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी जवळपास 70 मोर्चे काढले होते.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • शासनाच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात.

  • 1998चा शासन निर्णय रद्द करुन, बारावी आणि पदवीधारकांना जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र ठरवण्यात यावे. 

राज्य शासनाने महापरिक्षा पोर्टल बंद केले आणि विविध विभागाला ऑनलाईन परीक्षा घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त भ्रष्टाचार होईल. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र, सरकारने या मगणीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आम्ही एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करुन सरकारचे
लक्ष वेधणार आहेत. 
- महेश बडे, सदस्य,
एमपीएससी स्टुडेंट्स राईट्स् 

फडणवीस सरकारने सुरु केलेले महापरिक्षा पोर्टल बंद करून एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याचे आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले होते, महाविकास आघाडीची सत्ता आली मात्र नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली. सकराने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही राज्यभर आंदोनल करु.  
- राहुल कवठेकर,
सदस्य, एमपीएससी समन्वय समिती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News