MPSC कार्यालयावर युवकांनी केले अंडे मारो आंदोलन

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

संतप्त कार्यकर्त्यांनी एमपीएससीच्या कार्यालयावर अंडे फेकून मारले आणि अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न देखील केला.

मुंबई: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जाहीरातीमध्ये भटक्या जमाती- ड प्रवर्गाला आरक्षण दिले नाही, त्यामुळे वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी एमपीएससीच्या कार्यालयावर अंडे फेकून मारले आणि अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न देखील केला.

मोठी बातमी: व्यसनमुक्तीसाठी सरकारसोबत एनजीओही घेणार पुढाकार 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 फेबुवारीला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहीरात काढण्यात आली होती. एकुण 650 पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदाची पुर्व परीक्षा 3 मे राजी घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, भटक्या जमाती- डी (वंजारा) प्रवर्गाला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आरक्षण देण्यात आले नाही, त्यामुळे वंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपला रोष व्यक्त केला.

मोेठी बातमी: MPSC कार्यालयावर युवकांनी केले अंडे मारो आंदोलन 

'रिक्त पदे आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत याची माहिती राज्य सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवते त्यानुसार विविध पदांची जाहीरात एमपीएससी मार्फत काढली जाते. राज्य सरकारने दिलेल्या रिक्त जागा आणि आरक्षणात बदल करण्याचा अधिकार एमपीएससीला नाही, त्यामुळे भटक्या जमाती- डी (वंजारा) आरक्षणाचा विषय राज्य सरकाच्या आखत्यारीत येतो, त्यात एमपीएससी हस्तक्षेप करु शकत नाही' अशी माहिती एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी
आंदोलकांना दिली. 

संविधानाने भटक्या जमाती- ड (वंजारा) समाजाला 2 टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकुण   650 जागांपैकी 13 जागा एनटी- डी प्रवर्गाल राखीव असल्या पाहीजे. मात्र एकही जागा 'एनटी- डी'ला मिळाली नाही, त्यामुळे वंजारा समाजावर अन्याय होत आहे. नोकरी भरतीत राखीव जागांसाठीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे सांगून एमपीएससीने हातवर केले. पोलीस उपनिरीक्षक पदामध्ये एनटी- डी वर्गाला दोन टक्के राखीव जागा देण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
- धनराज गुट्टे, अध्यक्ष, अखिल भारतीय वंजारी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News