mpsc ची परीक्षा पुढे ढकलली; या तारखेला होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

mpsc ची परीक्षा पुढे ढकलली;  या तारखेला होणार परीक्षा

mpsc ची परीक्षा पुढे ढकलली;  या तारखेला होणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा २० सप्टेंबरला होईल असंही आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत अधिकृत संकेतस्थळावर पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

कोरोनामुळे होणा-या अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत, तसेच अनेक परीक्षा पुढे ढकलल्याचं आपण पाहतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिस-यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवेची पूर्वपरीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा १७ जूनला १३ सप्टेंबरला होईल अस जाहीर करण्यात आलं होतं. पण राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबरला असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि परीक्षेला बसणा-या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्मचारी आणि आयोगाकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत असं एमपीएसीकडून स्पष्ट केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News