परीक्षेसाठी MPSC ने जाहीर केले मार्गदर्शन तत्व; 'हे' नियम उमेदवारांना लागू होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020

परीक्षा कालावधीत पर्यवेक्षण आणि विद्यार्थ्याना हे मार्गदर्शन तत्व लागू होणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीत राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परीक्षा कालावधीत उमेदवारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली. परीक्षा कालावधीत पर्यवेक्षण आणि विद्यार्थ्याना हे मार्गदर्शन तत्व लागू होणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयोगाची मार्गदर्शन तत्वे तंतोतंत पालन करावे लागणार आहेत. 

काय आहेत मार्गदर्शन तत्वे?

 • विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईन नंबरवर आयोगाकडून लघुसंदेश पाठवला जाईल.
 • लघुसंदेशात परीक्षेचा वेळ आणि परीक्षा स्थळ सांगितले जाईल 
 • उमेदवाराने परीक्षा केंद्रात येण्यापूर्वी ट्रिपल लेयर मास्क घालने अनिवार्य आहे. कोणतेही मास्क तीन पदराचे असावे.
 • विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी आयोगाकडून एक किट दिले जाईल त्यात हॅन्डग्लोज, सॉनिटायझर, मास्क यांचा समावेश असेल. या साहित्याचा वापर उमेदवाराने परीक्षा कालावधी करणे अनिवार्य आहे.
 • परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी वारंवार सॉनिटायझरने हात निर्जंतुकीकरण करावे
 • उमेदवारांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास पर्यवेक्षकांना तात्काळ कळवावे, पर्यवेक्षक योग्य त्या उपाययोजना करतील. 
 • उमेदवारांनी परीक्षा देण्यापूर्वी आरोग्य सेतू ॲप आपल्या मोबाईल मध्ये सुरू करणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी परीक्षा कालावधी पारदर्शक पाण्याची बॉटली, अल्पोहार सोबत आणावा.
 • विद्यार्थ्यांना इतरांची पेन, पेन्सिल कोणतेही साहित्य वापरता येणार नाही.
 • दोन पेपरमधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडले जाणार नाही. 
 • परीक्षा केंद्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भित्तीपत्रके, सांकेतीक खुणा, सुचनाफलक लावावे 
 • उमेदवार आणि पर्यवेक्षकांनी शारिरीक अंतराचे नियम पाळावे. 
 • उमेदवारांनी वापरलेले हॅन्डग्लोज, सॉनिटायझर, मास्क, नॉपकींग कचरा पेटीत टाकावे. 

कधी होणार परीक्षा

 • राज्यसेवा पूर्व परीक्षा : ११ ऑक्टोबर २०२०, 
 • दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा : २२ नोव्हेंबर २०२० 
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा : १ नोव्हेंबर २०२० 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News