एमपीएसीच्या 'या' परीक्षा होणार ऑनलाइन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

अशी होणार परीक्षा 
पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासन 
सीसीटिव्ही वॉच 
ऑनलाइन पध्दतीनेच होणार मुल्यमापन 
हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेता येईल 

एमपीएसीच्या 'या' परीक्षा होणार ऑनलाइन 

महाराष्ट्र - कोरोनाच्या काळात परीक्षांचा गोंधळ आपण मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा पाहतोय, परीक्षांचा गोंधळ अद्याप मिटलेला नसून आता कोर्टात आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता परीक्षा ऑनलाइन घेण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात बाराशे केंद्र आहेत. तिथं पूर्व किंवा मुख्य परीक्षा घेण्यास येणा-या अडचणीमुळे यापुढे मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे आयोगाचे नियोजन सुरू केले आहे. पूर्व परीक्षेत पास झालेले मुख्य परीक्षेला कमी विद्यार्थी असतात, त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे पाऊल उचलले आहे. जिथे परीक्षा असेल तिथे सीसीटिव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येईल असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

अशी होणार परीक्षा 
पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासन 
सीसीटिव्ही वॉच 
ऑनलाइन पध्दतीनेच होणार मुल्यमापन 
हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेता येईल 

पीएसआय, एसटीआय, गट-क संवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. राज्यातल्या सुमारे दीडशे केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात येईल. एका खोलीत किमान २४ विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. ऑफलाइन पध्दतीची अनेक अडचणी यामुळे दूर होतील असं आयोगाचं म्हणणं आहे. जिल्ह्यातील निवडक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येईल. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर निकाल वेळेत लावणे शक्य असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News