हर्सूलच्या डोंगरातून एव्हरेस्टला गवसणी

(शब्दांकन - संकेत कुलकर्णी)
Monday, 3 June 2019

औरंगाबाद - शहराजवळ हर्सूलशेजारी असणाऱ्या नायगावचा मी. आई करीमाबी आणि वडील ताहेर शेख या सामान्य शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्माला आलो. नायगाव-हर्सूलचे डोंगर पालथे घालत लहानाचा मोठा झालेलो मी वयाच्या १८ व्या वर्षी पोलिसांत भरती झालो. ‘एनसीसी’मध्ये गिर्यारोहणाच्या छंदाला दिशा मिळाली. मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटमधून बेसिक कोर्स, तर दार्जीलिंगच्या प्रसिद्ध हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटमधून ॲडव्हान्स्ड कोर्स ‘ए’ ग्रेडने पूर्ण केला.

औरंगाबाद - शहराजवळ हर्सूलशेजारी असणाऱ्या नायगावचा मी. आई करीमाबी आणि वडील ताहेर शेख या सामान्य शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्माला आलो. नायगाव-हर्सूलचे डोंगर पालथे घालत लहानाचा मोठा झालेलो मी वयाच्या १८ व्या वर्षी पोलिसांत भरती झालो. ‘एनसीसी’मध्ये गिर्यारोहणाच्या छंदाला दिशा मिळाली. मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटमधून बेसिक कोर्स, तर दार्जीलिंगच्या प्रसिद्ध हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटमधून ॲडव्हान्स्ड कोर्स ‘ए’ ग्रेडने पूर्ण केला. यादरम्यान हिमाचल प्रदेशातील माउंट फ्रेंडशिप, क्षितिधार, सेव्हन सिस्टर, सिक्कीममधील माउंट काब्रुडोम ही शिखरे अनेकदा सर केली. २०१३ ला उत्तराखंडमधील तांत्रिकदृष्ट्या चढाईला सर्वांत कठीण कामेट शिखरालाही गवसणी घालण्याचा धाडसी प्रयत्न केला. 

२०१४ ला एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोचलो; पण चढाईला सुरवात होते न होते, तोच हिमस्खलन झाल्याने १६ शेर्पा मृत्युमुखी पडले. एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासातील ती पहिलीच सर्वांत मोठी मनुष्यहानी होती. मोहिमा रद्द झाल्याने मलाही माघारी फिरावे लागले. पुढच्या वर्षी पुन्हा जय्यत तयारीनिशी या मोहिमेवर गेलो; मात्र २४ एप्रिल २०१५ ला काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे एव्हरेस्टवर मोठा ॲव्हलांच आला. एका मोठ्या दगडामागे लपल्याने बचावलो; मात्र बेसकॅंप उद्‌ध्वस्त झाल्यामुळे पुन्हा परतावे लागले. 

सलग दोन मोहिमा अर्धवट सोडाव्या लागल्यामुळे मोठा खर्च झाला होता. आता घरातून, बाहेरून विरोध आणि खिशाचा खुळखुळा झालेला असतानाही अशी जिद्द बाळगणे, हे निव्वळ अशक्‍य; पण सर्व परिचितांनी पाठबळ दिले. हळूहळू पैसे उभे राहिले.

एक मे २०१६चा महाराष्ट्र दिन मी बेस कॅंपवर साजरा केला. तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिस दलाचा झेंडा फडकावून वर्दीतला कडक सॅल्युट ठोकला. एका नव्या ऊर्जेने पुढे झेपावलो. १९ मे २०१६ ला माझे पाऊल शिखरावर पडले. अनेक समस्या आल्या तरी २९ हजार ३५ फूट उंचीवर महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकविणारा मी आजवरचा पहिला गिर्यारोहक ठरलो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News