रशियाच्या माऊंट एलब्रुसवर मराठी झेंडा फडकवल्याबद्दल संभाजीराजेंकडून कौतुक

यिनबझ टीम
Saturday, 18 January 2020

तसं क्लांबिंग, ट्रेकिंग म्हटलं की सगळ्यांचा उर भरून येतो, पण ते ठिकाण सर करायचं म्हणजे साऱ्या अंगातून घाम निघतो. असच अवघड ठिकाण म्हणजे रशिया येथील माऊंट एलब्रुस (MOUNT ELBRUS).

मुंबई - तसं क्लांबिंग, ट्रेकिंग म्हटलं की सगळ्यांचा उर भरून येतो, पण ते ठिकाण सर करायचं म्हणजे साऱ्या अंगातून घाम निघतो. असच अवघड ठिकाण म्हणजे रशिया येथील माऊंट एलब्रुस (MOUNT ELBRUS). हाच माऊंट एलब्रुस आपल्या मराठी शिलेदाराने एका मोहिमेच्या माध्यमातून सर केलाय. तसा हा तरुण आहे कोल्हापुरचा; मात्र सध्या तो मुंबईत रोहातो, अशा सागर नलावडे या तरुणाने रशियातल्या माऊंटवर भारताचा झेंडा फडकवून नवा विक्रम केला आहे.

कोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सागर नलावडे यांना या विक्रमाबाबत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले आहे, तर पुढील अनेक मोहिमांसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. इतकच नाही तर या मोहिमेसाठी मार्गदर्शिका म्हणून ठरलेल्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनीही सागर नलावडे तसेच त्यांच्या टीमचे कौतूक केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News