मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल होणार; टिजर लॅंच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020

24 ऑगस्ट 2020 रोजी नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल, मात्र सध्यातरी मोटोरोला कंपनीने स्मार्टफोनचे नाव जाहीर करण्यास टाळले आहे. 

मुंबई : मोटोरोला कंपनी तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मोटोरोलाचे आकर्षक हॉडसेत तरुणाईला नेहमी भुरळ घातलात. मोटोरोलाने भारतीय बाजारात एका नव्या स्मार्टफोनचे टिजर लॉन्च केले. आणि फ्लिपकार्टला टॅग केले, त्यामुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोटोरोलाचा नवा फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 24 ऑगस्ट 2020 रोजी नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल, मात्र सध्यातरी मोटोरोला कंपनीने स्मार्टफोनचे नाव जाहीर करण्यास टाळले आहे. 

 

मोटोरोलाने एक ट्विट करून नऊ सेकंदाचा टिजर प्रदर्शिक केला. आणि फ्लिपकार्ड टॉग केले. नवा स्मार्टफोन कसा असेल याचा अंदाज टिजर वरून लावला जाऊ शकतो. टिजरमध्ये मोबाईलचे फीचर्स दाखवण्यात आले. यावरून स्मार्टफोनचा कॅमेरा आणि त्याचा परफॉर्मन्स हायलाईट करण्यात आला. मोबाईलमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना या नवीन फोनची उत्सुकता लागली आहे. मोटोरोलाच्या नवीन फोनमध्ये आता कोणता बदल होईल असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला, 24 तारखेला या सर्व प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना मिळणार आहेत.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्या नवनवीन प्रयोग करत आहेत. मोटोरोलाचा हा नवा प्रयोग किती यशस्वी होईल हे मोबाईल लॉन्च केल्यानंतर कळेल. मात्र सध्यातरी मोबाईलची उत्सुकता तरुणाईला लागली आहे. या नवीन मोबाईलमध्ये वेगळं काहीतरी असणार हे निश्चितच आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News