नविन फिचर्ससोबत Moto G9 आज भारतात लॉन्च; 'या' फोनला टक्कर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • बरीच प्रतीक्षा केल्यानंतर मोटोरोलाने आज आपला नवीन स्मार्टफोन Moto G9 लॉन्च केला आहे.
  • काही दिवसांपूर्वी कंपनीने या फोनचा टीझर लॉन्च केला होता.

मुंबई :- बरीच प्रतीक्षा केल्यानंतर मोटोरोलाने आज आपला नवीन स्मार्टफोन Moto G9 लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने या फोनचा टीझर लॉन्च केला होता. आज १२ वाजता हा फोन फ्लिपकार्टसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लॉन्च करण्यात आला आहे.

टीझर झाला होता लॉन्च

मोटोरोला इंडियाने ट्विटरवर एक टीझर लॉन्च केला होता. ज्याची लिंक कंपनीने फ्लिपकार्ट टीझर पेजवर शेअर केली होती. या लिंकमध्ये सांगण्यात आले आहे की, पुढच्या आठवड्यात एक नवा फोन कंपनी लॉन्च करणार आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की,  मोटो G9 सोबत मोटो G9  प्लस आणि मोटो G9 प्ले देखील लॉन्च होणार की,  नाही. परंतु, अशी चर्चा आहे की, कंपनी हा फोन मीड रेंजमध्ये लॉन्च करणार आहे.

 

 

Moto G9 मध्ये असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

Moto G9 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाले तर टीझरमध्ये सांगितल्यानुसार, या फोनमध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा फिचर्स आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, या फोनमध्ये देण्यात आलेल्या फिचर्सचा उपयोग करून युजर्सना कमी लाईटमध्येही उत्तम फोटो काढता येऊ शकतात. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मोटो G9 मध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉच असू शकते. तसेच या फोनमध्ये काही बेझल्सही दिले जाऊ शकतात.

 

 

Poco M2 प्रो सोबत असणार टक्कर

मोटो G9 ची टक्कर पोको M2 प्रो सोबत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन असणारा आयपीएस एससीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पोको M2 प्रो स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये इतकी आहे. तर 6GB रॅमच्या व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी ५०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News