प्रेरणादायी ‘हिरो’ प्रवास म्हणजे मोहनलाल मुंजाळ

तुषार सोनवणे
Thursday, 6 June 2019

उत्तुंग इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे बृज मोहनलाल मुंजाळ होय. फाळणीनंतर मुंजाळ यांचे कुटुंब पाकिस्तानातून अमृतसर येथे वास्तव्यास आले. या ठिकाणी त्यांनी सायकल रिपेअरिंग आणि स्पेअर पार्टस्‌ विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला.

उत्तुंग इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे बृज मोहनलाल मुंजाळ होय. फाळणीनंतर मुंजाळ यांचे कुटुंब पाकिस्तानातून अमृतसर येथे वास्तव्यास आले. या ठिकाणी त्यांनी सायकल रिपेअरिंग आणि स्पेअर पार्टस्‌ विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायातून त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता येऊ लागली. त्यातून त्यांनी लुधियाना येथे हिरो सायकल कंपनीची स्थापना केली. या ठिकाणी सायकलसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टची निर्मिती त्यांनी सुरू केली. सायकलची चेन, हॅण्डल, चेन-व्हील आदींची निर्मिती केली जाऊ लागली. दरम्यान, १९५६ मध्ये पंजाब सरकारने हिरो कंपनीला सायकल बनविण्याच्या उद्योगासाठी परवाना दिला. कंपनीने स्वतःचे भांडवल आणि सरकारच्या आर्थिक मदतीने सायकल निर्मिती सुरू केली. सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्तात प्रवासाची साधने उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेतून त्यांनी सायकल निर्मिती सुरू केली होती. मुंजाळ यांनी मोठ्या मेहनतीने कंपनीचे उत्पादन शिस्तबद्ध पद्धतीने वाढवत नेले. अशा प्रकारे १९७५ पर्यंत हिरो कंपनी देशातील सायकल उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली. हिरो ब्रॅंड तोवर देशभर प्रसिद्ध झाला होता. 

भारतातील मोठ्या उत्पादनाच्या यशानंतर कंपनीने भारताबाहेरसुद्धा हिरो कंपनीची सायकल निर्यात करणे सुरू केले आणि १९८६ पर्यंत हिरो कंपनी जगातील सर्वात मोठी सायकल निर्मिती करणारी कंपनी बनली. सायकलच्या विक्रमी उत्पादनाची नोंद गिनीज बुकनेदेखील घेतली. हिरो कंपनी आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना संस्थापक मुंजाळ यांनी दुचाकी क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हिरो कंपनीने मॅजेस्टिक या पहिल्या दुचाकीची निर्मिती केली. दुचाकी उत्पादन क्षेत्रात उतरल्यानंतर त्यांना एका यशस्वी भागीदाराच्या अनुभवाची गरज होती. त्या वेळी १९८४ मध्ये जपानच्या प्रसिद्ध होंडा कंपनीशी भागीदारीचा करार झाला. होंडा कंपनीच्या सहकार्यातून हरियाणातील धारूहेरा येथे दुचाकी निर्मिती कारखाना सुरू करण्यात आला आणि ‘हिरो-होंडा’ कंपनीच्या दुचाकी भारतीय बाजारात दाखल झाल्या. 

या कंपनीच्या दुचाकींना भारतीय बाजारपेठेने अक्षरश: डोक्‍यावर घेतले. ‘हिरो होंडा सीडी १००’ ही कंपनीची पहिली दुचाकी होय. त्यानंतर स्प्लेंडर, पॅशन, सीडी डिलक्‍स, प्लेजर आदी दुचाकी ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या.

काही व्यावसायिक कारणातून २०११ मध्ये हिरो आणि होंडा दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या आणि आपापले स्वतंत्र उत्पादन करू लागल्या. यानंतर हिरो कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प लिमिटेड’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आज हिरो कंपनी जगातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणारी कंपनी बनली आहे. या यशाचे श्रेय जाते ते बृजमोहनलाल मुंजाळ यांना, त्यांच्या ध्येयनिष्ठेला, त्यांच्यातील शिस्तीला! यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या मुंजाळ २०१५ मध्ये निधन झाले. परंतु आजही त्यांची प्रेरणा कंपनीला योग्य दिशा देत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News