आईच देते जगण्याची प्रेरणा..! 

परशुराम कोकणे 
Sunday, 12 May 2019

आई मुलांना लहानाचे मोठे करते.. संस्कार करून घडविते..., आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची हे आईच शिकवते..., आईच आनंदाने जगण्याची प्रेरणा देते, असे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी "मदर्स डे'निमित्त सांगितले. 

आई मुलांना लहानाचे मोठे करते.. संस्कार करून घडविते..., आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची हे आईच शिकवते..., आईच आनंदाने जगण्याची प्रेरणा देते, असे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी "मदर्स डे'निमित्त सांगितले. 

"मदर्स डे'निमित्त "सकाळ'ने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला. "सकाळ'च्या वाचक मनीषा कोठे म्हणतात, "आई हे दोन शब्द आहेत, पण शब्दात ब्रह्मांड साठविले आहे. आई मुलांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्न करते. मुलांच्या आवडी-निवडी जाणून घेत त्यांना घडविते. पण आज काहीजण आईला वृद्धाश्रमात पाठवतात. तिच्याकडे दुर्लक्ष करतात. "मदर्स डे' वर्षातून एकदाच साजरा करतो, तो रोजच व्हायला हवा.

आई म्हणजे सर्वस्व असते. मुलांचे पालनपोषण करताना तिचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. वडिलांपेक्षा आई मुलांना चांगल्याप्रकारे समजून घेते. खऱ्या अर्थाने तिच कुटुंबाचा आधार आहे. आम्ही विश्‍वासाने आईशी बोलतो. आजही आईचे मला मार्गदर्शन आहे - डॉ. सुहास सरवदे, नेत्रतज्ञ 

आई म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्‍वर. आत्मा आणि ईश्‍वराचे मिलन म्हणजे आई. आमच्या आईने आम्हाला संस्कारक्षम घडविले. जीवनात कोणतेही संकट येवो त्याच्यावर मात कशी करायची हे तिने शिकविले आहे. तिने मुलगा-मुलगी भेद कधीही केला नाही. 
- अर्चना पोरे, शिक्षिका 

आयुष्यात आनंदी, समाधानाने जगण्याची प्रेरणा आईच देते. आईच पृथ्वीची गंभीरता, आपची तरलता, तेजाची तेजस्विता, वायूची सरलता, आकाशाची व्यापकता, माई तुझ्या ठाई. तू आई तू बाई, तुझविना कोणा जन्म नाही. 
- डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News