आईचे गर्भ

अनामिक
Friday, 31 May 2019

कधीतरी मिळेल समाधान पोटाच्या अनंत प्रश्नांना
आणि गर्भाच्या अजन्मा
उत्तरांना 
याच शाश्वत आशेवर...

इटूकलीचं कुतुहल जागलं
आईच्या वात्सल्याने तुडूंब गर्भाकडे पाहून
आणि
आपसुकच तिने निसर्गाचं झबलं वर करून पाहिलं
आपल्या पोटाकडे
मग आईने गोंजारलं
तिला आणि त्या आशेच्या गर्भाला सुद्धा

आता ही
त्या गर्भाकडे पाहतेय
आदीम कुतुहलाने
अन् ती
पाहतेय शहारून हीच्या सनातन पोटाकडे 
निरंतर...

पोटाचा गर्भ कधी होतो
कळतच नाही
ही पाहातच आहे...
ती गोंजारतच आहे...

कधीतरी मिळेल समाधान पोटाच्या अनंत प्रश्नांना
आणि गर्भाच्या अजन्मा
उत्तरांना 
याच शाश्वत आशेवर...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News