आईवरचं प्रेम...

सुनिल पवार
Monday, 13 May 2019

तू न सांगताही बाळा, तिला दुःख तुझं कळतंय...
तुझ्याच सुखासाठी तिचा, जीव असा तळमळतोय!

भाकरी करपु नये म्हणून, ती बोटं आपलं जाळतेय...
अन् तू गीळताना म्हणतो, आई तुला काय कळतंय!

आईवरचं प्रेम तुझं, आज नेटवर उफाळून येतंय...
घरात मात्र तुझी आई, रोजचंच दळण दळतेय!

तू न सांगताही बाळा, तिला दुःख तुझं कळतंय...
तुझ्याच सुखासाठी तिचा, जीव असा तळमळतोय!

भाकरी करपु नये म्हणून, ती बोटं आपलं जाळतेय...
अन् तू गीळताना म्हणतो, आई तुला काय कळतंय!

तुझ्या प्रेमाचं बेगडी वारु, आज नेटवर जे उधळतंय...
ते पाहून रे वेड्या, माझं मनही आता मलाच छळतंय!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News