वेदनांच्या पलीकडे आई असते...

रसिका जाधव (यिनबझ)
Sunday, 12 May 2019

मातृदिनच्या निमित्ताने सर्व मातांना मातृदिनाच्या हदिक शुभेच्छा. 

मातृदिनच्या निमित्ताने सर्व मातांना मातृदिनाच्या हदिक शुभेच्छा. 
'आई' हा शब्दच आता वेगवेगळ्या शब्दात रुपांतरीत होताना दिसत आहे. आई नंतर मम्मी, मॅाम, ममा या अनेक नावाने तिला बोलावले जाते. आई ही अशी एकच व्यक्ती आहे की जन्माच्या आधीपासून ते शेवटपर्यंत निस्वार्थी प्रेम करत असते.
 
आई ही घराचं मांगल्य असते. आई आणि मुलांच नातं हे मैत्रीचे असते. आई ही मुलांची किंवा मुलीची पहिली मैत्रीण असते. "आई आमची सर्व प्रथम 'गुरु' "त्यानंतर आमचे आस्तित्व सुरु"

असं म्हणतात की देवाला प्रत्येक घरात राहता येत नाही, म्हणुन देवाने प्रत्येकाला आई दिली. 

आईचं काळीज हे खुप मोठ असत, स्व:ताच्या पोटच्या गोळ्याला लहानाच मोठे करायचं आणि एका अनोळखी मुलांच्या स्वादिन कराच हे फक्त आईच करु शकते. कन्यादान करायलासुध्दा वाघासारखं काळीज लागतं आणि ते फक्त आईकडेच असतं. आपण कुठेही गेलो असलो आणि घरी आलो की आपण घरभर आईला शोधत असतो म्हणजेच घराकडे ओढ लावते ती आई असते. 

आईचं महत्व त्या व्यकतीला विचारा, ज्याच्याकडे आई नाही. ज्या व्यक्तीकडे आई आहे, त्या व्यक्तीला आईचं महत्व समजत नाही. आज-कालची मुल-मुली आईवरुन एकमेकांना शिव्या देतात. ज्या आईमुळे हे जग बघायला मिळाले, त्या आईला सांभाळायला या तरुण मुला-मुलींना लाज वाटते?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News