मातृदिन ही संधीच...

मेघना जाधव, नागठाणे 
Sunday, 12 May 2019

शाळेतून किंवा महाविद्यालयामधून घरी आल्यानंतर बऱ्यापैकी सर्वांचाच पहिला प्रश्‍न असतो, आई कुठे आहे? खरंतर तेव्हा आपल आईकडे काहीच काम नसत. आपल्याला फक्‍त तिला डोळे भरून पाहायच असत. आई या शब्दात एवढी आपुलकी आणि विश्‍वास आहे की एखादी गोष्ट खरी आहे हे पटवून देण्यासाठी आपण सहज बोलून जातो आई शपथ... 

शाळेतून किंवा महाविद्यालयामधून घरी आल्यानंतर बऱ्यापैकी सर्वांचाच पहिला प्रश्‍न असतो, आई कुठे आहे? खरंतर तेव्हा आपल आईकडे काहीच काम नसत. आपल्याला फक्‍त तिला डोळे भरून पाहायच असत. आई या शब्दात एवढी आपुलकी आणि विश्‍वास आहे की एखादी गोष्ट खरी आहे हे पटवून देण्यासाठी आपण सहज बोलून जातो आई शपथ... 

जगातलं सर्वात निःस्वार्थी नात आईच मानल जाते. आपल्या आईचे डोळे म्हणजे एक आरसा असतो, ज्यात कधीच आपण मोठे दिसत नाही. त्या डोळ्यात नेहमी आपल्याला प्रेम आणि विश्‍वास दिसतो. आपली आई एकाच वेळी एक मुलगी, पत्नी, बहीण अशा कित्येक नाती सांभाळत असते. या नात्यांच्या आणि माणसांच्या गराड्यात ती एक नात  मात्र नेहमी विसरताना दिसून येते. 

एक स्त्री म्हणून स्वत:च स्वत:शी असलेले नात ती विसरते. ती नेहमी इतरांसाठी जगते; पण स्वत: स्वत:साठी सुद्धा जगायच असत, याचा विसर तिला पडतो. इतरांच्या आनंदासाठी मुलाबाळांच्या पालनपोषणासाठी आणि विशेषत: घरच्यांच्या सोयीसाठी आपली आई स्वत:च अस्तित्व हरवून बसते. हे आपण अनेक वेळा पाहिले आहे. कदाचित आपणसुद्धा तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात मागे पडलेलो असतो ते आपल्या कृतीतून... 

मित्र हो, आज मातृदिन आहे आणि हिच आपल्यासाठी एक संधी आहे. आपल्या आईला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची आणि ती विसरत असलेल्या नात्याला प्रकाशित करण्याची आणि हिच कदाचित भेट असेल मातृदिनाची. आईच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं सोप आहे; परंतु तिच्या डोळ्यांमध्ये दडलेल दु:ख आणि कोमल हस्यामागे दडलेल्या वेदना समजून घेणे, आजच्या पिढीसाठी तरी अवघड गोष्ट आहे. व्हॉटसऍप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या अभासी जगतात वावरणाऱ्या आजच्या पिढीला आईच्या प्रेमाची तिच्या कष्टाची आठवण "मदर्स डे'च्या दिवशीच व्हावी ही खरी शोकांतिका आहे. 

लहानपणी सतत आईच्या आजूबाजूला वावरणारे आपण अचानक करिअर, अभ्यासात गुंततो आणि तिच्यापासून दुरवतो. नकळत आपल्याकडून तिच्याकडे दुर्लक्ष होते आणि याच काळात बऱ्याच स्त्रिया विविध आजारांना बळी पडतात. आजचा दिवस हा आईचा दिवस आहे. यादिवशी आपण सर्वांनी आपला वेळ तिच्यासाठी द्यायला हवा. कारण हिच एक संधी आहे, आईला समजून घेण्याची आणि काळानुसार मागे पडत चाललेल्या माय लेकराच्या नात्याची वीण घट्ट करण्याची. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News