आई बहिणींना तुमच्याकडून या आहेत अपेक्षा

सोनल महादेव मंडलिक 
Wednesday, 23 January 2019

आजच्या घडीला महिलांवर होणारे अत्याचार पाहता पुरुषांची महिलांकडे पाहण्याची वाईट नजर बदलणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही मुलगा किंवा भाऊ आपल्या आई आणि बहिणीबद्दल अपशब्द ऐकून घेऊ शकत नाही.  जो आदर आणि सन्मान घरातील आई आणि बहिणींना मिळतो तोच आदर समाजातील प्रत्येक स्त्रीला मिळावा हीच त्यांची अपेक्षा असते. 

आई आणि बहीण ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असणारी जवळची आणि पहिली मैत्रीण...! हल्ली भावाचं लग्न झाल्यावर तो बदलतो अशी प्रत्येक कुटूंबात बोंब असते.
प्रत्येक आईला आपल्या मुलांकडून तसेच प्रत्येक बहिणीला आपल्या भावाकडून अपेक्षा या असतातच. मग आपल्या भावाने राखी बांधल्यानंतर छोटं का होईना गिफ्ट द्यावं अशी अपेक्षा आपल्या लाडक्या बहिनीला असतेच किंवा आपला मुलगा चुकीच्या मार्गाला जाऊ नये हि अपेक्षा असताना धडपड करणारी आई असो... या आणि अशा अनेक भावनांच्या ऋणानुबंधानं जोडलेल्या काही अपेक्षा आज आपण जाणून घेऊयात. 

महिलांचा आदर करावा 
आजच्या घडीला महिलांवर होणारे अत्याचार पाहता पुरुषांची महिलांकडे पाहण्याची वाईट नजर बदलणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही मुलगा किंवा भाऊ आपल्या आई आणि बहिणीबद्दल अपशब्द ऐकून घेऊ शकत नाही.  जो आदर आणि सन्मान घरातील आई आणि बहिणींना मिळतो तोच आदर समाजातील प्रत्येक स्त्रीला मिळावा हीच त्यांची अपेक्षा असते. 

समजून घ्यावं 
प्रत्येक आई आणि बहिणीची किमान अपेक्षा असते की, आपल्या मुलांनी किंवा भावाने आपल्याला समजून घ्यावे. 

आपल्याला वेळ द्यावा 
आजकाल कामानिमित्त आपल्या कुटुंबाना वेळ देणे अनेकांना शक्य होत नाही. परदेशात राहणारे तर याला अपवादच ठरतात. मात्र भाऊ किंवा मुलगा कितीही बिझी असला तरी दिवसातील थोडा वेळ तरी त्याने आपल्यासोबत घालवावा असं प्रत्येक आई आणि बहिणीला वाटत असतं. 

विश्वास आणि पाठींबा असावा 
प्रत्येक नात्यात विश्वास आणि पाठिंबा असणं गरजेचं असतंच. बहिणीसाठी तर आपला भाऊ म्हणजे पाठीराखा असतो. मात्र आईला देखील काही गोष्टींमध्ये मुलाच्या आधाराची पाठिंब्याची आवश्यकता भासते. 

त्याच्या मनातलं बिनधास्त आणि हक्काने सांगावे 
आपल्या भावाने किंवा मुलाने आपल्यापासून काहीच लपवून ठेवू नये अशी प्रत्येक आई आणि बहिणीची अपेक्षा असते. आई आणि बहीण ही मैत्रीण असून अगदी मनमोकळेपणाने तिच्यासमोर व्यक्त व्हावं अशी त्यांची इच्छा असते,

वाढदिवसाला काहीतरी स्पेशल करावं 
आपल्या वाढदिवशी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करावं असं प्रत्येक आईला वाटत नसतं, मात्र आपला वाढदिवस स्पेशल करून काहीतरी गिफ्ट द्यावं अशी अपेक्षा बहिणीची असते. 

लाईफ पार्टनर आल्यानंतरही तेवढेच लक्ष द्यावे 
लग्न झाल्यानंतर आपला भाऊ किंवा मुलगा बदलला असं बहुतेक वेळा गाऱ्हाणं असतं. लग्नानंतर लाईफ पार्टनर आल्यावरही भावाने किंवा मुलाने आपल्याकडे तेवढेच लक्ष द्यावे. आपल्याशी संवाद साधावा, काही वेळ सोबत घालवावा अशी अपेक्षा असते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News