माझ्या शब्दांपलीकडची आई...

श्रृती वाघाटे (यिनबझ)
Sunday, 12 May 2019

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे तर सर्व जण बोलतात पण माझ्यासाठी...

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे तर सर्व जण बोलतात पण माझ्यासाठी... आई या एक साध्या, सोपा शब्दामध्ये दडलेली  असंख्य रूपांची माया आहे...

एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. जन्म देऊन जगात आणणारी आई देवच असते, परशू यशोदाने जसं कृष्णाला संभाळलं, तीसुद्धा देवापेक्षा कमी नाही.

 आई म्हणजे ममता,  आत्मा आणि ईश्वर या तीघांचा संगम म्हणजे 'आई' होय. 

आई म्हणजे मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते.

 समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी व आकाशाचा कागद करून आईचे गुणगान लिहिण्यासाठी बसलो, तरी आईची माया लिहून संपणार नाही. म्हणूनच तर म्हणतात ‘आई’ ही दोन अक्षरे हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवली पाहिजेत. 

आपल्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंत आपल्या मुलाच्या सर्व व्यथा फक्त आणि फक्त आपली आईच समजू शकते. आपल्या कल्याणासाठी आई रागावते; पण त्यामागच्या भावना मात्र फार वेगळ्या असतात. आईच्या मायेतच इतकी ताकद आहे की रागापेक्षा अवखळपणे केलेले प्रेम अधिक लक्षात राहते. जगातील कशाचीही जखम भरून काढता येईल; पण आईच्या विरहाची कमतरता कधीच भरून काढता येणार नाही.

पैसे कमावण्याच्या, मोठे होण्याच्या स्पर्धेत तुम्ही आई वडींलाना विसरून जाता, त्यांच्या कडे दुर्लक्ष करता. तुम्ही कितीही मोठे व्हा, जग जिंका; पण जर का तुमची आई तुमच्या सोबत नसली तर, ते सगळं निरर्थक वाटतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News