आई

दिपाली साळेकर- खामकर
Tuesday, 13 August 2019

आई एक कवडसा अंधाऱ्या घरातला
आई एक झरा कोरड्या वाळवंटातला
आई एक धडा अभ्यासात नसलेला
आई एक दरवाजा कडिकुलूप नसलेला

आई एक पहाट मधुर किलबिल करणारी
आई एक रात्र साखर झोपेत नेणारी
आई एक आशा निराशेला मारणारी
आई एक ज्योत नेहमी तेवत राहणारी

आई एक उमेद नवीन स्वप्नाची
आई एक सूरवात नवीन नात्याची

आई एक पालवी भर चैत्रातली
आई एक सावली रखरखीत उन्हातली
आई एक सकाळ सुंदर वसंतातली 
आई एक दिशा नवीन विश्र्वातली

आई एक कवडसा अंधाऱ्या घरातला
आई एक झरा कोरड्या वाळवंटातला
आई एक धडा अभ्यासात नसलेला
आई एक दरवाजा कडिकुलूप नसलेला

आई एक किरण काळ्याकुट्ट जंगलातल
आई एक कोड कोणालाच न सुटलेलं

आई एक प्रतीक आदिशक्तीचं
आई एक फुल काटेरी झुडपाचं
आई एक सूत्र अवघड गणिताचं
आई एक उत्तर कठीण प्रश्नाचं
आई एक औषध मोठ्या आजाराचं 
आई एक मुळ ढेरेदार वृक्षाचं

आई एक आधार संपूर्ण कुटुंबाचा
आई एक पाया मजबूत घराचा
आई एक किनारा अथांग समुद्राचा
आई एक अनुभव जगण्यासाठी गरजेचा
आई एक स्वर गण्याच्याही पलीकडचा
आई एक अंक गणिताच्या ही पुढचा

आई एक कणा कठीण प्रसंगात ताठ राहणारा
आई एक दोर सारी नाती जपणारा
आई एक शब्द संकटकाळी तारणारा
आई एक श्वास जीवनदान देणारा
आई एक कल्पतरू इच्छापूर्ती करणारा
आई एक मंत्र मंदिरात ही जपला जाणारा 

आई एक ग्रंथ पावित्र्य टिकवून ठेवणारा
आई एक दिवा सर्वत्र प्रकाशित करणारा
आई एक समुद्र कधीही न आटणारा
आई एक अध्याय वाचूनही न उलगडणारा
आई एक नाद वेडावून टाकणारा
आई एक ध्वनी सतत ऐकू येणारा

आई एक स्तोत्र नवीन जीवन देणारं
आई एक पाऊल नेहमी पुढे चालणारं
आई एक पुस्तक सगळ्यांना वाचता येणारं
आई एक वादळ अवती भोवती घोंगवणारं
आई एक हास्य नेहमी चेहऱ्यावर उमटणारं

आई एक स्वप्न सगळ्यांना आवडणारं
आई एक व्यसन कधीच ना सुटणारं
आई एक गीत कधीही गुणगुणता येणारं
आई एक भविष्य भाकीत न करता येणारं
आई एक अस्तित्व सारखं भासत राहणारं
आई एक अश्रू आनंदात ओघळणारं
आई एक दवबिंदू सकाळच्या प्रहरी सुखावणारं

आई एक नदी तहान भागवणारी 
आई एक वाट कुठेही न अडखळणारी
आई एक भाषा न बोलताही समजणारी
आई एक ज्वाळा नेहमी धगधगत राहणारी
आई एक मैत्रीण आयुष्यात पहिली येणारी
आई एक नशा पहिल्या प्रेमात चढणारी

आई एक आठवण नेहमीच याद राहणारी
आई एक गोष्ट मोठी मोठी होणारी
आई एक ऊर्जा कधीच न संपणारी
आई एक स्त्री उदरात जीव वाढवणारी
आई एक व्यक्ती सगळ्यांना सामावून घेणारी
आई एक अशी कोणाचीही उणीव भासू न देणारी
आई एक अशी कधीही न विसरता येणारी
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News