सर्वाधिक यशस्वी कर्णधार

महेश सोरटे
Sunday, 16 August 2020

2011 च्या फायनल मध्ये तू वानखेडेवर षटकार मारला आणि भारतात दिवाळी साजरी झाली... ! आम्ही तूला कधीही विसरू शकत नाही... ! धन्यवाद महेंद्रसिंग धोनी सर...! विजया नंतर जो मागे थांबायचा आणि पराभवा नंतर जो समोर असायचा तो धोनी होता..

आज फेसबुक बघताना अचानक पणे एक Big Breaking नुज्य आली की, धोनी ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली... स्वतः ट्विट करून केली निवृत्ती जाहीर अशी बातमी आली आणि काही वेळासाठी मन शांत झालं आणि ह्या पुन्हा तुझे हेलिकॉप्टर शॉट आम्हाला कधी बघायला नाही मिळणार आणि तू आम्हला टी-२० आणि विश्वचषक मिळवून दिलास... तू एक सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून तुझी ओळख होती आणि तू आज हे निवृत्ती घेणं योग्य नाही... तुझ क्रिकेट मधील योगदान देश कधीही विसरणार नाही. तुझी ओळख एक कॅप्टन कूल म्हणून तुझी ओळख एक सच्चा खिलाडी आहेस तू कितीही अवघड परिस्थिती असली तरी डोक शांत ठेवून. उतावीळ न होता तू योग्य निर्णय घेऊन तू गेली 15 वर्ष आम्हाला खूप आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण दिलेस.!

2011 च्या फायनल मध्ये तू वानखेडेवर षटकार मारला आणि भारतात दिवाळी साजरी झाली... ! आम्ही तूला कधीही विसरू शकत नाही... ! धन्यवाद महेंद्रसिंग धोनी सर...! विजया नंतर जो मागे थांबायचा आणि पराभवा नंतर जो समोर असायचा तो धोनी होता..
       
मला वाटतं सचिन नंतर जर कोणावर एवढं प्रेम केलं असेन आणि एवढं connect जर कोणाबरोबर मी झालो असेन तर तो महेंद्र सिंह धोनी बरोबरच... याने आम्हाला World Cup जिंकण्याचा आनंद काय असतो हे दाखवलं... अनेक हरलेले सामने कसे जिंकायचं हे दाखवलं आणि ते सामने हरलो तरी त्या वेळी कस शांत राहायचं हे शिकवलं... तुझ ते विकेटच्या मागे उभ राहून पुढे काय होईल याचा अंदाज लावणं आणि तसच होण, तू केलेले वेगवेगळ्या प्रकारचे stumpings, एका रनला, दोन रन मध्ये कन्व्हर्ट करणं, तु जेव्हा दुसऱ्यारन्ससाठी पळायचा तेव्हा वाघ पळतो असं वाटायचं तुझं ते शेवटच्या over पर्यंत थांबणं, Helicopter shot  हे सगळं मिस करू आम्ही... तू क्रिकेट मधून जरी निवृत्ती घेतली असली, तरी तू आमच्या मनावर कायम राज्य करत राहशील... !
    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News