पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुली; पॉर्न पाहणं वाईट नसतं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 30 August 2019

भारतासह अनेक देशांमध्ये पॉर्न साईट्सवर बंदी घातली आहे. त्यासोबतच आपल्याकडे पॉर्न पाहणं किती वाईट आहे हे वाचलं असेल. पण नुकताच एक नवा रिपोर्ट समोर आला जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, आनंदासाठी पॉर्न पाहणारे, व्यसन म्हणून पाहणारे आणि दुःखी असे तीन प्रकार आहेत.

भारतासह अनेक देशांमध्ये पॉर्न साईट्सवर बंदी घातली आहे. त्यासोबतच आपल्याकडे पॉर्न पाहणं किती वाईट आहे हे वाचलं असेल. पण नुकताच एक नवा रिपोर्ट समोर आला जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, आनंदासाठी पॉर्न पाहणारे, व्यसन म्हणून पाहणारे आणि दुःखी असे तीन प्रकार आहेत.

फार कमी लोकांना माहीत आहे की, पॉर्न इंडस्ट्री ही एकसारखी नसते. ही इंडस्ट्री तीन भागांमध्ये विभागली गेली असून त्यातील एक भाग हा निरोगी मानण्यात आला आहे. ७५ टक्के लोक हे आनंदासाठी पॉर्न पाहतात. हा ग्रुप आठवड्याला जवळपास 24 मिनिटं पॉर्न पाहतात. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत. कमिटेड मुलींची संख्या या ग्रुपमध्ये सर्वात जास्त आहे.

दुखी आणि अस्वस्थ ग्रुप- या ग्रुपमधील लोक पॉर्न पाहण्याचा संबंध भावनिक समस्यांशी जोडतात. हा ग्रुप आठवड्याला १७ मिनिटं पॉर्न पाहतात. व्यसन म्हणून पाहणाऱ्यांच्या बाबतीतही नवीन माहिती समोर आली.

या संशोधनात सहभाग घेतलेल्यांपैकी ११.८ लोक हे आठवड्याला ११० मिनिटं पॉर्न व्हिडिओ पाहतात. या ग्रुपमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे.

या ग्रुपमधील लोकांमध्ये लैंगिक समाधान कमी आणि लत म्हणून व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पहिल्या ग्रुपमध्ये समाधान जास्त असतं आणि लत कमी असते. तर दुःखी आणि अस्वस्थ लोकांना अक्टिव्ह पॉर्न युझर मानण्यात येत नाही. ते लत म्हणून पॉर्न पाहत नसून कोणत्या तरी गोष्टींनी त्रासलेले असतात म्हणून पॉर्न पाहतात. पॉर्न पाहण्याची लत वाढली तर अनेकदा मेडिकल मदत घ्यावी लागते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News