सडक २ ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • अभिनेत्री आलिया भट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नव्याकोऱ्या सडक २ ह्या चित्रपटाचा ट्रेलर १२ ऑगस्ट रोजी यूट्यूब तसेच इतर ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात आला.
  • चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अनेकांनी तो पहिला.

मुंबई :- अभिनेत्री आलिया भट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नव्याकोऱ्या सडक २ ह्या चित्रपटाचा ट्रेलर १२ ऑगस्ट रोजी यूट्यूब तसेच इतर ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अनेकांनी तो पहिला. २४ तासात सडक २ ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला जवळपास १ कोटी १४ लाख व्ह्यूव्ज मिळाले. परंतु ह्या चित्रपटाच्या ट्रेलरने भारतात एक नवा विक्रम केला तो म्हणजे सर्वाधिक डिसलाईक मिळवण्याचा.

सडक २ ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला ४३ लाखांपेक्षा अधिक डिसलाईक मिळाले आहेत तर चित्रपटाला मिळालेल्या लाईकसची संख्या ही केवळ अडीच लाखांच्या घरात आहे. अभिनेता सुशांत सिंग राजूपतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात असंतोषाच रान उठलं. घराणेशाही मधून आलेलया कलाकारानं विरोधात लोक नाराजी व्यक्त करू लागले आणि त्याचाच फटका सडक २ ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील बसला. सडक २ ह्या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर ह्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. आलिया भट ही दिग्दर्शक महेश भट यांची कन्या आहे, संजय दत्त हे देखील अभिनेता सुनील दत्त यांचे सुपुत्र आहेत तर आदित्य रॉय हा चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांचा भाऊ आहे. या प्रमुख भूमिका असलेल्या कलाकारांना बॉलिवूड मधील घराणेशाहीची किनार असल्यामुळे प्रेक्षक ह्या चित्रपटाबद्दल आपली नापसंती व्यक्त करीत आहेत. 

सडक २ ह्या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर अपलोड केल्या पासून अवघ्या १२ तासात ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला ३६ लाखांपेक्षा अधिक वेळा डिसलाईक करण्यात आले.  त्यामुळे हा ट्रेलर भारतातील सगळ्यात नापसंत विडिओ म्हणून समोर आला आहे. तसेच नेपोकिड्सनी भरलेला सडक २ हा चित्रपट हॉट स्टार ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार असल्याने नेटकऱ्यांकडून हॉट स्टार अनइंस्टॉल करण्याची देखील मागणी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News