कला अकादमीत ‘मोरूची मावशी’ नाट्यप्रयोग

फिरस्ती
Friday, 12 April 2019

मोरूची मावशी’ हे विनोदी नाटक असून शेवटपर्यंत रसिकांना हसवणारे आहे. भरत जाधव यांनी यापूर्वी अशी नाटके गाजवली आहेत. रोटरी क्‍लब म्हापसा यांनी हे नाटक गोव्यात आणले आहे. कला अकादमी पणजी येथे ता. १३ रोजी सायं. ७ वा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात नाटक होणार आहे. 

'मोरूची मावशी’ हे विनोदी नाटक असून शेवटपर्यंत रसिकांना हसवणारे आहे. भरत जाधव यांनी यापूर्वी अशी नाटके गाजवली आहेत. रोटरी क्‍लब म्हापसा यांनी हे नाटक गोव्यात आणले आहे. कला अकादमी पणजी येथे ता. १३ रोजी सायं. ७ वा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात नाटक होणार आहे. 

विजय चव्हाण यांचे अजरामर नाटक म्हणजे ‘मोरूची मावशी’. या नाटकाचे लेखन सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक आचार्य अत्रे यांनी केले असून ते रंगभूमीवर खूपच गाजले व त्यातली स्व. विजय चव्हाण यांनी साकारलेली भूमिका रसिकांना फार आवडली. आता ही भूमिका साकारण्याची संधी अभिनेते भरत जाधव यांना प्राप्त झाली आहे.  जेव्हा हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले, त्यावेळी बापूराव माने यांनी ‘मावशी’ची भूमिका साकारली होती. तेव्हा ती भूमिका रसिकांना आवडली होती.

विजय चव्हाण यांनी साकारलेली मावशी खऱ्या अर्थाने सुपरहिट झाली ती ‘टांग टिंग’ गाण्यामुळे. जेव्हा मोरूची मावशीची सुधीर भट यांनी निर्मिती केली, त्यावेळी नाटकास बुकिंग तसे विशेष नव्हते. सुधीर भट यांना वाटले की, नाटकात गाणे असावे. त्यांनी मंगेश कुलकर्णी यांना बोलावून त्यांच्याकडून एक गाणे लिहून घेतले आणि तेच ‘टांग टिंग टिंगा’ गाणे अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले.

विजय चव्हाण यांच्या आवाजात ते गाणे गायले गेले आहे. भरत जाधव हे ‘मावशी’ची भूमिका साकारणार आहे. या नाटकाचे तिकीट बुकिंग ‘माय शो’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ‘ईडीसी’ इमारत पणजी समोरील पेस्ट्री पॅराडाईज येथे तिकीट विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News