कधी न पाहिलेला मोरगिरीचा किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

पाटण वरून चिपळूणकडे जाताना एक फाटा फुटतो पश्चिम-नैऋत्य दिशेला १० किलोमीटर अंतरावर मोरगीरीचा प्रसिद्ध गुणवंतगड किल्ला आहे पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो पश्चिम-वायव्य दिशेला दातेगड आहे, या दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक पाटण रस्ता जातो....

पाटण वरून चिपळूणकडे जाताना एक फाटा फुटतो पश्चिम-नैऋत्य दिशेला १० किलोमीटर अंतरावर मोरगीरीचा प्रसिद्ध गुणवंतगड किल्ला आहे पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो पश्चिम-वायव्य दिशेला दातेगड आहे, या दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक पाटण रस्ता जातो....
१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता त्या आधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा... इ.स.१८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपण्यात आला सध्या गुणवंतगडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत फक्त एक विहीर शिल्लक आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात देखील मोरगिरी नावाचा किल्ला आहे....

गडाबद्दल हा किल्ला टेहळणी साठी वापरत असावा. कारण गडावर फक्त पाण्याची टाकी दिसतात. बाकी तटबंदी, बुरुज, दरवाजा, तोफा आणि वाड्याचे अवशेष काही दिसत नाही. गडावरून तुंग, तिकोणा, कोरीगड असे महत्वाचे किल्ले आणी लांबच्या लांब पसरलेला पवना जलाशयचा परिसर दिसतो.

वातावरण स्वच्छ असेल, तर बहुतेक त्या परिसरामधील लोहगड, विसापूर इत्यादी दुसरे गड सुद्धा दिसत असतील. त्यामुळे मोरगिरीवरून बाकीच्या गडांवर आणि आजूबाजूच्या परिसरावर चांगली नजर ठेवता येत असावी. प्रणवने सांगितले, गडावर जाण्यासाठी अजून दोन गावातून वाटा  आहेत. पण प्रणवने सुचविल्याप्रमाणे, एस्सार ऍग्रोटेक कंपनी समोरून जाणारी वाट लवकर म्हणजेच दीड तासात गडावर पोहचते. त्याचवाटेने आम्ही बरोबर दीड तासात गडावर पोहचलो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News