दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक जागा हव्यात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक जागा हव्यात

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक जागा हव्यात 

महाराष्ट्र - दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेश प्रक्रियेत अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे केली आहे. ही मागणी सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे केली आहे. 

 ICSE आणि CBSC बोर्डाच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांना अंतर्गत अधिक गुण दिल्याने विद्यार्थ्यांना अधिक टक्केवारी मिळाली आहे. याच्याबरोबर उलट एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फक्त २० गुण मिळत असल्याने त्यांना अधिक टक्केवारी मिळणार नाही. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश घेताना अधिक त्रास होईल. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी सत्यजित तांबे यांनी ही भूमिका घेतली आहे. 

अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक त्रास होऊ नये, तसेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र दिले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News