लॉकडाऊनमध्ये  देशातील दीड लाखांपेक्षा अधिक पालक झाले ‘डिजिटल साक्षर’ ! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

“शिक्षण जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो यावर आमचा विश्वास आहे व तसाच आमचा प्रयत्न पण आहे. कोविड-१९ चा एकंदर शिक्षण क्षेत्रावर जो काही परिणाम होत आहे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी डिजिटल साक्षर अॅप अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल.”- प्रेम यादव,मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन. 

लॉकडाऊनमध्ये  देशातील दीड लाखांपेक्षा अधिक पालक झाले ‘डिजिटल साक्षर’ ! 

महाराष्ट्र - कोरोनाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात जगात झालाय की, प्रत्येक देशात ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे. ही सुवर्णसंधी साधून प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन विद्यार्थी, तरुण आणि पालक यांना ऑनलाइन फ्री लर्निंग अॅपद्वारे शिक्षण सुरू केलं आहे. लॉकडाउन काळात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश हरयाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक राज्यातील दीड  लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, तरुण आणि पालक यांना व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून डिजिटल साक्षर करण्यात इन्फोटेक फाऊंडेशनला यश आले आहे. 
 

सुरूवातीला प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनने ‘डिजिटल साक्षर’ अॅप विकसित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील अत्यंत सोप्या आणि मनोरंजन पद्धतीने तयार केलेले व्हिडीओ https://www.digitalsakshar.com/ या  अॅपमध्ये मोफत उपलब्ध केले. तसेच ‘डिजिटल साक्षर’ अॅपमध्ये  41  कोर्सेस आणि  4,000 पेक्षा अधिक व्हिडीओ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मोफत उपलब्ध आहेत. 3 ते 50 वयोगटातील विद्यार्थी, तरुण, माता आणि पालकांसाठी हे कोर्सेस आहेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी तंत्रज्ञानाचे शिक्षण ‘हवे तेव्हा, हवे तसे व हवे तितके’ मिळण्यासाठी डिजिटल साक्षर हे एक पाऊल आहे. तळागाळातील विद्यार्थी, तरुण व महिलांना डिजिटल साक्षर बनवणे आणि पारंपारिक अध्ययनातील डिजिटल दरी कमी करण्याच्या उद्देश प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनचा आहे.


 
‘डिजिटल साक्षर’ अॅपमध्ये लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक विकासासाठी आकर्षक मनोरंजन करणारी बालगीते आहेत. तसेच घर बसल्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास, भूगोल, संगणक विज्ञान, इंटरनेट सुरक्षा यांसारखे विषय सोप्या व्हिडीओच्या माध्यमातून शिकता येतील. यामध्ये तरुणांसाठी आवश्यक असणारी नोकरीविषयक कौशल्ये, ऑप्रेटींग सिस्टम, ऑफिस ऑटोमेशन आदींची दैनंदिन जीवनातील महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होईल. यात तंत्रज्ञानाची आवड असलेल्या म्हणजेच टेक्नोसेव्हीं तरुणांसाठी एचटीएमएल, कोडींग, सी प्लस प्लस, जावा, अॅण्ड्रॉइड, मायएसक्यूएल हे कल्पना शक्तीला चालना देणारे व्हिडीओ आहेत. 

https://lh3.googleusercontent.com/59AFTYDA4Vn846UY9igmPbQpRofof2es-weesF2gM8wFe40h0tdKHJKXVKYtbxuLfgkoYqo5v7cUE34Hrfv9ti-nAJHS855BNIKCAw-9FoiKoM3kPVt8lodU4N8oywMcDh_-9pGFp179dvB4zWhOSQmQaDevkSk1PRW1E9bdUXxPoSkpJsHwr8CrcvregFJ6OHVDDJdFdR2g7FPeYV6UewAs72tVjh15iUmnE8wFzKFyic9Kv_qVwUbhTNRtYn1mOXFkouxzWq6RTTc8kc-e4ZFnwCDQbOE_WANdUEeer-buVbfJLzI7dQ7WCnlwE98xZsZmJTWO27I2iIrSFVrgLQoE3W2fgTrdOrlr27iAWMmZfslqlEuo3tFvDy8b1kq_raonMyN02AS2ITCsifKPn02SAjs8h-x3ZdxU7cj5yhrOjy52Mz6hEA2Sho4B8FDuZQA2R3HEvpRxjehnIKFv1Qng3YClwWGunpZtUYvy4YmPn8KBPAvHB2AudamMQMXzZTrcQBtnt5FuIxqlCQVAHyHXrUzkkUtV4vllm1N8dWeqBTL8dbm-WaxSvXTG1BffFMHzkW5b9Cbk-HcETFsT-wv4obSdmthRB2cz3jwKMef2KmBMHPxaU3SIJRFii1y0Pfi2mG10sBP2pwG2yiRgAjipoZts0asRtN2g3-tXIS6HPh0-W1as8cNS2-Jv=w288-h217-no?authuser=0

त्याचबरोबर रिलेटिव्ह डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमसारख्या बाबी ज्ञानात भर घालणाऱ्या आहेत. अॅपमध्ये असलेली व्यवसायाशी निगडीत कौशल्ये आत्मसात करून प्रोफेशनल व सोशल नेटवर्किंग आणि सॉफ्ट स्किल्स निश्चितच उपयोगी ठरू शकतात. तसेच यामध्ये फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ शिकण्याची कौशल्येही आहेत.  विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी 6 दिवस व्हॉटस् अॅपद्वारे 10 ते 15 मिनिटांचे शैक्षणिक व्हिडीओ पाहून सांगितलेल्या अॅक्टीविटी केल्या. कोर्स झाल्यानंतर परीक्षा देऊन त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. अधिक माहितीसाठी : http://campaign.digitalsakshar.com/
 

“शिक्षण जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो यावर आमचा विश्वास आहे व तसाच आमचा प्रयत्न पण आहे. कोविड-१९ चा एकंदर शिक्षण क्षेत्रावर जो काही परिणाम होत आहे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी डिजिटल साक्षर अॅप अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल.”- प्रेम यादव,मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News