चाटे स्कूलच्या कबड्डी स्पर्धेत मॉरल किड्‍स हायस्कूल प्रथम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

मॉरल किड्‍सच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत जगदंबा शाळेचा १२ गुणांनी पराभूत केले. द्वितीय फेरी चाटे स्कूलचा सहा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला;

औरंगाबाद : आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत मॉरल किड्‍स हायस्कूलच्या नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला. चाटे स्कूलतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. मॉरल किड्‍सच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत जगदंबा शाळेचा १२ गुणांनी पराभूत केले. द्वितीय फेरी चाटे स्कूलचा सहा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला; तसेच अंतिम फेरीत परमवीर विद्यालयावर १२ गुणांनी मात करीत प्रथम क्रमांक मिळविला.

या संघात कर्णधार पवन सहाणे, उपकर्णधार सुहास भगत यांच्यासह अजिंक्य लाड, अवधूत कुलकर्णी, स्वप्नील राठोड, अजित पवार, ऋषिकेश चव्हाण, सूर्यकांत पाटील, तेजस चन्ने, अजित पौळ, संदेश घुले आदी खेळाडूंचा समावेश होता. या विजयानंतर मॉरल किड्‍सच्या संघाची गोवा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैसवाल, संदीप जैस्वाल, मुख्याध्यापिका अर्चना देशपांडे, कोकिळा अधाने, श्रीमती हत्तेकर, व्याख्याते कुमार बिरदवडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शिक्षक पंढरीनाथ गडदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News