मासिक जनजागृतीची नोटकऱ्यांमध्ये स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 May 2020

आपल्या समाजात महिलांच्या मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. या विषयाचा संकोच करण्याची रूढीच पडली आहे जणू. गुरुवारी आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस होता.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, कवी, साहित्यकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरराव सावरकर यांची गुरुवारी जयंती होती. नेटकऱ्यांनी सावरकरांच्या देशभक्तीपर कविता, फोटो आदी समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या. सावरकरांना आदरांजली देताना अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या कवितांचे वाचन करणारे व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केले.

कोरोनाचे संकट राज्यात गडत होत असताना, विदर्भातील शेतकऱ्यांना आणखी एका मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ते संकट म्हणजे टोळधाडीचे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये टोळकिड्यांनी थैमान घातले असून, त्याच्या उपद्रवामुळे पिके नष्ट होत आहेत. शेतकरी या टोळ किड्यांना आवर घालण्यास असमर्थ ठरत आहेत. असे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे टोळधाडीचे संकट आणि किती दिवस शेतकऱ्यांना छळणार, असा प्रश्‍न नेटकरी विचारत आहेत.

आपल्या समाजात महिलांच्या मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. या विषयाचा संकोच करण्याची रूढीच पडली आहे जणू. गुरुवारी आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस होता. त्यामुळे तरुण नेटकऱ्यांनी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. पाळीमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल आपण समजून घेत नाही. सॅनिटरी पॅड लपवून ठेवणारी मानसिकता बदलली पाहिजे, असे नेटकरी यानिमित्ताने व्यक्त होत होते. काही फेसबुक ग्रुपमध्ये पाळीविषयी जनजागृती करणाऱ्या मिम्सची स्पर्धा घेतली गेली. नेटकऱ्यांच्या या चळवळीमुळे या संवेदनशील विषयावर सर्वांचे लक्ष वेधले गेले.

राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू असणार आहे. राज्यातील नागरिकांसमोर आता "इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर निघावं तर कोरोनाची भीती आणि नाही निघता आले तर बेरोजगारीची भीती, अशी सध्या परिस्थिती आहे. कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले अर्थकारण कधी रुळावर येईल, असा सवाल नागरिकांच्या मनात पडला आहे. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या समाजमाध्यमांवर पुढे येत आहेत. त्यामुळे नेटकरी लॉकडाऊन आणि कोरोनाविषयी अपडेट मिळवत होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News