बँकेची कामे आधीच करून घ्या; मार्चमध्ये तब्ब्ल ६ दिवस बँका बंद..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

गेल्या महिन्यात देखील बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी  संप केला होता. 

नवी दिल्ली : बँकेची महत्त्वाची कामे करायची असल्यास मार्चपूर्वीच करा. मार्चमध्ये तब्ब्ल ६ दिवस बँक बंद राहणार आहेत. १० मार्च ते १५ मार्च काळात बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बँक कर्मचारी संघटना ११ मार्चपासून १३ मार्चपर्यँत संपाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बँकेची कामे आधीच करून घेणे फायदेशीर ठरेल. 

याशिवाय १४ मार्चला दुसरा शनिवार आणि १५ मार्चला रविवारची सुट्टी असणार आहे. त्यामुळे १० मार्चपासून सलग ६ दिवस बँक बंद राहणार आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार, बँक कर्मचारी संघटना याबाबत संपाची घोषणा करू शकतात. गेल्या महिन्यात देखील बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी संपावर गेले होते. 

दरम्यान पुन्हा एकदा बँक कर्मचारी संपाच्या मार्गावर जाणार आहेत. त्यामुळे बँकेच्या संदर्भातील महत्त्वाची कामे १० मार्चपूर्वीच करावी. त्यानंतर सलग बँक ६ दिवस बंद असल्याने अनेक कामे रखडू शकतात. दरम्यान या काळात ऑनलाईन बँकिंग सुरु असल्याने ग्राहकांनी त्याचा वापर करावा. यावेळी एटीएममध्ये पैशांचा तुटवडा भासण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News