पावसाळ्यात कपडे लवकर वाळवायचे हे आहेत सोप्या ट्रिक्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019

पावसाळ्यात धुतलेले कपडे पटकन सुकवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. कपडे बाहेर वाळत घालता येत नाहीत. दमट हवेमुळे दोन- तीन दिवस कपडे वाळत नाहीत. मग हे सोपे उपाय करून पाहा...

पावसाळ्यात धुतलेले कपडे पटकन सुकवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. कपडे बाहेर वाळत घालता येत नाहीत. दमट हवेमुळे दोन- तीन दिवस कपडे वाळत नाहीत. मग हे सोपे उपाय करून पाहा...

पावसाळ्यात दमट हवा असते, त्यात आपण घरातच कपडे वाळत घालतो. त्यामुळे कपडे वाळायला वेळ लागतो. अशा वेळी एखादा छोटा स्टँड विकत घेतला तर बराच त्रास कमी होईल.

कपड्याचा स्टँड घरातल्या त्यातल्या त्यात हवेशीर जागी ठेवा. जीन्ससारखे सर्वांत जाड कपडे एका बाजूला वाळत घाला.

कपडे घट्ट पिळून, व्यवस्थित झटकूनच वाळत घाला. घट्ट पिळताना नाजूक कपडे खराब होणार नाहीत, याचा मात्र विचार करा.

कपड्याचा स्टँड थोडा वेळ का होईना पंख्याखाली ठेवा. यामुळे कपडे लवकर वाळायला मदत होईल.

दोन कपड्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवा आणि काही तासांनी कपड्याची बाजू बदलत राहा. यामुळे कपड्यांमध्ये दमटपणा राहणार नाही.

कपडे लवकर वाळावेत म्हणून काही जण त्यावरून गरम इस्त्री फिरवतात. पण हा उपाय धोकादायक आहे. यातून कपडे खराब होऊ शकतात आणि शॉक बसू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News