कोरोना उपचाराच्या नावाखाली पैशांची लुट सुरु आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
  • कोरोना संसर्गच्या उपाराच्या नावाखाली अनेक प्रकारे पैशांची लुट होत आहे.
  • लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत?

मुंबई :- संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना संसर्गच्या उपाराच्या नावाखाली अनेक प्रकारे पैशांची लुट होत आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत? तर काहीच्या नोकऱ्या आहेत पण त्यांना पगार दिला जात नाही किंवा त्यांना अर्धा पगार दिला जात आहे. त्यात ही लूट गरीब माणसांना   शक्य नाही. कोरोना झाला म्हणून त्या व्यक्तिला रूग्णालयात दाखल करून घेऊन लाखो रूपये घेतले जात आहेत. काही रूग्णालय तर निगेटिव्ह व्यक्तीला देखील पॉझिटिव्ह आहे सांगून त्या व्यक्तीकडून पैसे घेत आहेत. रूग्णालयासह रूग्णवाहिकांनी देखील लूट करायला सुरूवात केली आहे. ते सुध्दा अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. कोरोना उपचाराच्या नावाखाली पैशांची लुट सुरु आहे, असा आरोप लोकांकडून होताना दिसतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

देशात आणि राज्यात कितीतरी पक्षांच्या सत्ता आल्या व गेल्या, परंतु या राजकीय पक्षांनी राज्यातील आरोग्य यंत्रणांना किती प्राथमिकता दिली, हे आजच्या परिस्थितीत कळून येत. मुळात आरोग्य यंत्रणांचा मुद्दा हा कधी राजकारणातही आला नाही, शिवाय मंदिर व स्मारकांवर नेहमीच राजकारण होत आले. यात नुसता राजकीय पक्षांची चुकी नसून सामान्य लोकांची ही चुकी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्याला नक्की काय हवं आहे किंवा काय महत्त्वाचं आहे हे समझायला हवं.

निशांत टाळे

कोरोना उपचारादरम्यान नागरिकांकडून खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लुट होत आहे. ही लूट जास्तीतजास्त खाजगी हॉस्पिटलमध्ये होताना दिसून येते. एका कोरोना रुग्णाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल तब्बल 2 ते 3 लाखांचं बिल देते. जर कोरोनावर कोणत्याही प्रकारची लस अजूनही उपलब्ध नाही तर खाजगी हॉस्पिटल 2 लाख ते 3 लाख रुपये नक्की घेतात कशाचे?

कित्येक निगेटिव्ह रिपोर्ट हे पॉझिटिव्ह करून दाखवले जातात. अनेकांकडून कोरोना टेस्ट करण्यासाठीचेही पैसे दुपटीने घेतात. कित्येक ठिकाणी रुग्णवाहिकांनीही कितीतरी पटीने पैसे घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कित्येक व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, खाजगी कंपन्या, मंदिरे बंद आहेत. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. आणि अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये जर कोरोना उपचाराच्या नावाखाली नागरिकांकडून पैशाची लूट होत असेल तर त्यांना जगणं अशक्य होईल हे नक्कीच.

श्रध्दा ठोंबरे

लॉकडाऊन करणे हा काही कोरोना वर नियंत्रण मिळवण्याचा उपाय असू शकत नाही. यापूर्वी देखील आपण ४ महिने लॉकडाऊन करून पाहिले आहे, आपला त्या मागचा हेतु जरी प्रामाणीक असला तरी त्यातून काहीच निष्पन्न होतांना दिसत नाही. उलट या लॉकडाऊनच्या काळातही रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. लॉकडाऊन मुळे लोकांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांना घर चालवण्यासाठी प्रचंड ताण निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर बाहेर भाजीपाला, किराणामालाची दुकाने बंद असतात त्यामुळे घरात देखील अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांच्या मुलभूत गरजांवर सुद्धा नीट भागवता येत नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्धा ह्यांनी करोना ह्या आजाराव आज पर्यंत कोणतेही औषध उपलब्ध नाही, तरी ह्या वर उपचार करणाऱ्या एका व्यक्तीसाठी ४-५ लाख रुपये खर्च येतो त्यामध्ये एकदा व्यक्ती गरीब असेल तर तो कुठून आणेल.

मला आज पर्यंत एक प्रश्न पडला की, कोणी सांगेल का भिकारी लोक,  भंगार वेचानारे, खुप गरीब लोक या चाळी मध्ये राहणाऱ्या व्यक्तींना करोना झाला आहे. तर त्यांना करोना होऊच शकत नाही कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नाही, ज्यांच्या कडे जास्त पैसा आहे त्यालाच करोना होत आस काही आहे का?  तर नाही कारण हे व्यक्ती तेवढे पैसे भरणार कुठून हा पण एक प्रश आहे. करोना काळात काही दवाखान्यात तर तो व्यक्ती मेला म्हणून सांगायचे आणि त्यांच्या शरीरातले सर्व अवयव काढून घ्यायचे. मी फक्त ऐवडेच म्हणेल की, करोना हा आजार नसून हा एक व्यवसाय केला आहे.

मी ऐवडेच बोलेल की, हे दिवस जावे आणि लवकरच सुखाचें दिवस यावे...

महेश सोरटे

कोरोना भारतात आला तेव्हा तो एक आजार होता. पण सद्या त्याचा लोकांनी बाजार केला आहे. कोरोना नावाच्या आपत्तीने गरीब श्रीमंत सर्वसामान्य जनतेला लुटले. कोरोनाच्या आजारावर औषध नाही. मग तो बरा कसा होतो? दवाखाण्याचे बिल ३ ते ४ लाख कसे होते? एवढे बिल झाल्यानंतरच तो व्यक्ती त्या आजारापासून लगेच बरा कसा होतो?  ही किती विचार करण्याची गोष्ट आहे. औषध उपलब्ध नसतानाही एवढे बिल करणे ही एक कला आहे. पण या कलेमध्ये शिकलेला समजदार माणूस सुद्धा भरडला गेला आणि त्याला पूर्णपणे बळी पडला.

कोणताच आजार हा भयंकर नसतो. माणूस हा शक्तिशाली प्राणी आहे. त्यामुळे माणसाने जर सकारात्मक विचार केला आणि शरीरातील संपूर्ण ताकतीने जर झुंज दिली, तर कोरोनाला सुद्धा हरवू शकतो. साधा सर्दी खोकला झाला तरी डॉक्टर कोरोना झाला म्हणून सांगून टाकतात आणि त्या व्यक्तीला जेवढे लुटता येईल तेवढा लुटण्याचा प्रयत्न करतात. आज मुंबई सारख्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये खूप व्यक्तींना लुटण्याची प्रकरण समोर आली, त्यांच्यावर कारवाई केली. तरीसुद्धा त्यांच्यावर कोणताच परिणाम झालेला दिसला नाही. त्यामुळे आज असे दिसून आले की, या समाजामध्ये माणूस माणसासारखा वागतोय का?

अफाट लाखाच्या बिलामुळे तर आज कितीतरी लोक दवाखान्यामध्ये जायला टाळू लागली आहेत. रस्त्यावर्ती फुटपाथ वर बसणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची भीती नाही का? असे एक ना अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. मग औषध नसतानाही लाखोंचे बिल घेणारे डॉक्टर देवमाणूस म्हणून कसे काय ओळखले जातात. तेव्हा पुन्हा एकदा प्रश्न पडतो खरोखरचं माणूस माणसाशी माणसासारखा वागतोय का?

शिल्पा नरवडे

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News