"मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये!" अस म्हणणाऱ्या चिमुरड्याचा अखेर पबजीचा नाद सुटला!

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Tuesday, 22 September 2020
  • "मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये!", "काय केलतं त्या पबजीने! उगाच बॅन केलं" असं म्हणत टाहो फो़डणारा तो चिमुरडा तुम्हाला आठवतं असेल.
  • पब्जी बंद झाल्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सर्व सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई :- "मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये!", "काय केलतं त्या पबजीने! उगाच बॅन केलं" असं म्हणत टाहो फो़डणारा तो चिमुरडा तुम्हाला आठवतं असेल. पब्जी बंद झाल्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सर्व सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. तो जिवाच्या आकाताने ओरडत होता. तो फक्त १३ वर्षाचा मुलगा पब्जी बंद झाला म्हणून एवढा रडत होता की, त्यांचे जणू खूप मोठे नुकसान झाले आहे. पबजीने अनेक लोकांना वेड लावले होते. त्यात आता तर काय लॉकडाउन पासून सगळे घरी असल्यामुळे  मुलांना पब्जीचे जास्तच वेड लागले होते.

मात्र आता त्या मुलाचा पबजीचा नाद सुटलाय आणि त्याची जागा "लुमा गेम्स" ने घेतली. पबजीने अनेकांना वेड लावले होते. अनेक लहान मुले या गेमच्या आहारी गेले होते. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर तर होतच होता पण त्यांच्या स्वास्थ्यावरही होत होता. लॉकडाऊनमुळे तर लहान मुलांचे आणि  मोठ्याचे देखील मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले. पब्जीमुळे अनेक पालक देखील खूप कंटाळे होते. कारण पब्जीच्या नादात मुलांना तहान आणि भुक देखील महत्त्वाची वाटत नव्हती.

पण काही भारतीय तरुणांनी अशा गेम्सवर रामबाण उपाय काढला. त्यामुळे मुलांचे भरपूर मनोरंन तर होईलच त्याच बरोबर त्यांची शैक्षणीक प्रगतीही होईल. साजीद चौगुले आणि त्याच्या टीमने प्रथमिक अभ्यासक्रमाचे रुपांतर अशा काही भन्नाट गेम्समध्ये केले आहे. ज्यामुळे तुमच्या मुलांचा अभ्यासही होईल आणि मुले ही ते गेम्स आवडीने खेळतील. त्यांमुळे अभ्यास कर रे... अस पालकांना मुलांच्या मागे लागवे लागणार नाही. त्याच बरोबर यात असेही अनेक गेम्स आहेत. ज्यात मुलांसोबत पालकही सहभाग होऊ शकतात जेणे करुन पालकांना ही मुलाच्या आकलनाचा, अभ्यासातल्या प्रगतीची जवळून अनुभवता येईल. हे गेम्स सध्या 'LUMA WORLD' नावाने अमेझॉनवरही उपलब्ध आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News