एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020

सुसाट निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर तो चुकीच्या मार्गाने निघाला आणि समोरून आलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली. क्षण भरात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आणि मागे असलेल्या बाईक चालकाचा जाग्यावर मृत्यू झाला.

एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य 

महाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या इंदूर-इच्छापूर महामार्गावर एक विचित्र अपघात झाला असून त्यामध्ये एका ट्रॅक्टरचे क्षण भरात दोन तकडे झाले असून अंगावर काटा आणणारा व्हिडीओ शूट झाला आहे. या विचित्र अपघातामध्ये एका तरूणाचा मृत्यू देखील झाला आहे. इंदूर-इच्छापूर महामार्गावर असलेल्या चामती फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. 

या अपघातात बुरहानूपार येथे राहणाऱ्या 28 वर्षीय विजय याचा मृत्यू झाला आहे. भरधाव आलेल्या ट्रकने समोरून आलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली त्यामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आणि बाईकवरील एका तरूणाचा जागीत मृत्यू झाला. हा अपघात प्रत्यक्षदर्शी पाहत असताना शूट केला आहे. ट्रक इतका फास्ट चालवतोय म्हणून काही तरूण पोलिसांना दाखवण्यासाठी व्हिडीओ तयार करीत होते. तेवढ्यात हा अपघात झाला. 

सुसाट निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर तो चुकीच्या मार्गाने निघाला आणि समोरून आलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली. क्षण भरात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आणि मागे असलेल्या बाईक चालकाचा जाग्यावर मृत्यू झाला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News