मॉम डँड फोरेवर... खर हाय का?

जयराम मोरे, धुळे
Tuesday, 23 April 2019

तो स्वतःला 'श्रावण ' समजतो
आई वडीलांचा शब्द म्हणजे 
अंतिम सत्य मानणारा

नेकटंज 
गोंदून आलाय तो
आपल्या हातावर..,
'मॉम डँड फोरेव्हर ' 
शहरातल्या दोस्तारांच्या हातावरील
वाकड्या तिकड्या रेषांचे 
टँटू पाहून.

कारण..
तो स्वतःला 'श्रावण ' समजतो
आई वडीलांचा शब्द म्हणजे 
अंतिम सत्य मानणारा
इसनखीच्या फेऱ्यात अडकण्या
अगोदर...

पण 
भुरीकातडीच्या आगमनाने
सारंच चक्र उफटं फिरू 
लागले
आई बाची अमृतवाणी 
त्याला निरर्थक बोचणे वाटू लागले
ती म्हणजेच स्वर्ग त्याला भास 
होवू लागले..

शेवटी...
एकदिवस त्यानं धयड्या मायबापले 
वृध्दाश्रमाच्या कोंडवाड्यात 
कोंडून आला.., 
बायकोले टिव्ही देखत
त्यांची अडचण
होते म्हणून..

वृध्दाश्रमाच्या
शिवाड्या जवळ येताच त्यानं
धयडा धयडीला 
धक्का देत
आत ढकललं 
त्या कोंडवाड्यात
गाडीचं फाटूक लावताना 
त्याच्या हातावर गोंदलेल नाव 
मला अगदी स्पष्टपणे 
दिसलं...

मॉम डँड फोरेवर..

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News