‘मोलकरीण बाई’चा प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 2 March 2019

स्वतःचे घर चालवण्यासाठी इतरांच्या घरात धुणी-भांडी करण्याचे काम करते ती घरकाम करणारी बाई. मेहनतीने पैसे कमवणाऱ्या, घरकाम करणाऱ्या बाईचं पात्र आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये सर्वांनीच पाहिलं; पण आता घरकाम करणाऱ्या बाईचं महत्त्व सांगणारी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मोलकरीण बाई’ असं या मालिकेचे नाव आहे. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेत उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्‍विनी कासार आणि गायत्री सोहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेबाबत सुप्रिया सांगते, ‘खरं तर घरकाम करणाऱ्या बाईचं आपल्या आयुष्यात मोलाचं स्थान असतं. त्यांच्या मदतीमुळेच मी बारा ते तेरा तास माझं काम लक्ष देऊन करू शकते. अशा महत्त्वपूर्ण व्यक्तीवर मालिका येणं ही धाडसी बाब आहे आणि आजवर मी अशा प्रकारची भूमिका साकारली नव्हती.’ ‘मोलकरीण बाई’ मालिका प्रेक्षकांना आपलसं करणार एवढे नक्की.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News