मोहम्मद फराह सर्वाधिक धावण्याचा जागतिक विक्रम करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 June 2020

चार वेळचा ऑलिंपिक विजेता मोहम्मद फराह एका तासात सर्वाधिक अंतिम धावण्याचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. रोड रेसिंग सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी फराह ट्रॅकवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे.

लंडन ः चार वेळचा ऑलिंपिक विजेता मोहम्मद फराह एका तासात सर्वाधिक अंतिम धावण्याचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. रोड रेसिंग सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी फराह ट्रॅकवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे.

ब्रसेल्समध्ये 4 सप्टेंबरला होणाऱ्या एजी मेमोरियल व्हॅन डॅम स्पर्धेत तो जागतिक विक्रमासाठी उत्सुक आहे. इथिओपियाच्या हॅली गॅब्रेसिलासी याने 2017 मध्ये एका तासात 21.285 किमी धावण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

कोरोना आक्रमणानंतर जागतिक ऍथलेटिक्‍स महासंघाने नुकताच नवा स्पर्धा कार्यक्रम जाहीर केला आहे. सरावातील सहकारी बशीर अब्दी याच्या साथीत फराहने विक्रमाचे लक्ष्य बाळगले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News