सध्याचा गोलंदाजीचा काळ हा मोहम्मद शमीच्या नावावर - शोएब अख्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 February 2020
  • सध्या भारत - न्यूझीलंड टी -२० मालिका हि चांगलीच गाजतेय.भारताने तर आपली विजयी घोडदौड मात्र कायम राखली आहे.
  • या मध्ये भारताने तब्बल ४-० ने मालिकेत आघाडी घेतली असून संपूर्ण मालिका खिशात घातली आहे. 

मुंबई : आजकालचा काळ हा भारतीय क्रिकेटसाठी चांगलाच सुवर्णयुगाच्या रूपाने उदयास येतोय. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अधिपत्याखाली तर भारतीय संघ तर चमकदार कामगिरी करताना दिसतोय.

परंतु भारतीय संघाच्या या उल्लेखनीय यशामागे भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या धडाकेबाज कामगिरीची किनार असल्याचं स्पष्ट मत रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून नावलौकिक असलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे.

सध्या भारत - न्यूझीलंड टी -२० मालिका हि चांगलीच गाजतेय.भारताने तर आपली विजयी घोडदौड मात्र कायम राखली आहे. या मध्ये भारताने तब्बल ४-० ने मालिकेत आघाडी घेतली असून संपूर्ण मालिका खिशात घातली आहे. 

या सर्व भारतीय संघाच्या यशाला मोहम्मद शमीची भेदक गोलंदाज कारणीभूत असून सध्याचा काळ हा भारतीय क्रिकेटचा गोलंदाज मोहम्मद शमीचा असल्याचं वक्तव्य शोएब अख्तर यांनी केलं.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News