मोहम्मद आमीरची इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी पीसीबीकडे विनंती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर लवकरच इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघात सहभागी होणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केली आहे.

लाहोर : वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर लवकरच इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघात सहभागी होणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केली आहे. याआधी 20 जून रोजी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. दरम्यान दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी आमीर पत्नीसोबत लाहोर येथेच थांबला होता. आता त्यानं इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी पीसीबीकडे विनंती केली आहे.

तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला आमीर टी -20 मालिकेपूर्वी संघात दाखल होईल. तसेच इंग्लंडमधील नॅशनल हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये मोहम्मद इम्रानला पाठवण्याची संघ व्यवस्थापनाची विनंती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही मान्य केली आहे. आमीर आणि इम्रान यांची आज कोरोना चाचणी होईल आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांच्या दोन्ही चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांनाही लाहोर येथील जैव सुरक्षितता वातावरणात राहावे लागेल आणि बुधवारी दुसरा रिपोर्ट काढण्यात येईल. त्यानंतर ते इंग्लंडसाठी रवाना होतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News