एवढ्या पगाराच्या लोकांसाठी मोदी सरकार घेऊन येते मोठी योजना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • केंद्र सरकार आता नविन योजना सुरू करते आहे. परंतु या योजनेचा फायदा अधिक पगार असणाऱ्या लोकांना होणार आहे.
  • केंद्र सरकार आता एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ईएसआयसीच्या योजनेचा विस्तार करणार आहे.

नवी दिल्ली :-  केंद्र सरकार आता नविन योजना सुरू करते आहे. परंतु या योजनेचा फायदा अधिक पगार असणाऱ्या लोकांना होणार आहे. केंद्र सरकार आता एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ईएसआयसीच्या योजनेचा विस्तार करणार आहे. या योजनेचा उद्देश अधिक पगार असलेल्या नोकरदारांना, कामगारांना ईएसआयसीच्या योजनांचा फायदा होऊ शकेल. सुत्रांनच्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने ईएसआयसीच्या आरोग्य विमा योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला दिला आहे.

या प्रस्तावामध्ये ज्या कामगारांचा पगार ३०००० रुपये आहे त्यांनादेखील आरोग्य विम्याचे संरक्षण आणि इतर फायदे देण्यात यावेत असे म्हटलेले आहे. सध्या ईएसआयसीच्या फायद्यांसाठी २१००० रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारीच पात्र होते. त्यांच्या पगारातील काही रक्कम ईएसायसीला जाते. यामुळे ते आरोग्य विम्याचे लाभार्थी होतात. अशा कामगारांना इन्शुअर्ड पर्सन म्हटले जाते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातील ०.७५ टक्के आणि कंपनीकडून ३.२५ टक्के रक्कम ईएसआयसीमध्ये जमा करते. याबदल्यात कर्मचाऱ्याला आरोग्य विमा आणि कॅश बेनिफिट दिले जातात.

एका सरकारी अधिकाऱ्यानुसार कामगार मंत्रालयाने आपल्या सर्व्हेमध्ये कोरोना संकटामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये ईएसआयसी सोबत जोडण्यासाठी सध्याच्या अटी शिथिल केल्या जाव्यात.

नोकरी गमावलेल्या कामगारांना दिलासा

कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या ५०  टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास ४० लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. यासाठी तीन महिन्यांचे त्याना मिळणारे वेतन एकत्र करून त्याच्या निम्मे देण्यात येणार आहे. हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या २४ मार्च ते ३१ डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News