त्वचारोग उपचारात आधुनिकता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 May 2019
  • बालपण, तारुण्यपण, वृद्धत्व या सर्व वयोगटांत त्वचेचे व केसांचे वेगवेगळे त्रास होताना दिसतात. त्याच्या उपचारासाठी गेल्या 10 वर्षांत खूप नवीन उपचार पद्धती आल्या आहेत.
  • त्यात लेझर उपचार, कॉस्मेटिक सर्जरी, हेअर ट्रान्सप्लांट, स्कीन ग्राफ्टिंग आदी काही उपचार.
  • विविध उपचार व त्यांचे उपयोग या बद्दल सविस्तर माहिती देणारा हा लेख. 

बालपण, तारुण्यपण, वृद्धत्व या सर्व वयोगटांत त्वचेचे व केसांचे वेगवेगळे त्रास होताना दिसतात. त्याच्या उपचारासाठी गेल्या 10 वर्षांत खूप नवीन उपचार पद्धती आल्या आहेत. त्यात लेझर उपचार, कॉस्मेटिक सर्जरी, हेअर ट्रान्सप्लांट, स्कीन ग्राफ्टिंग आदी काही उपचार. विविध उपचार व त्यांचे उपयोग या बद्दल सविस्तर माहिती देणारा हा लेख. 

अनावश्‍यक केस काढणे - डायोड लेझरद्वारे चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर, पाठीवर असलेले अनावश्‍यक केसांना काढण्याची सोय. स्त्री व पुरुष दोघांना या उपचाराचा लाभ घेता येतो. 
पिंपल्स, आय. पी. एल. लेझर - पिंपल्स ही तरुणांना होणारी समस्या आहे. त्यावर उपचार न केल्यास काळे डाग किंवा खड्डे होऊ शकतात. त्यामुळे चेहरा विद्रूप होतो. 
कार्बनडाय ऑक्‍साईड लेझर - पिंपल्स, गोवरमुळे पडलेले खड्डे लेझरद्वारे ABLATE कमी करण्यासाठीचा उपाय. या लेझरचा वापर ग्लो, बारीक सुरकुत्या यांच्यासाठीही केला जातो. 
 

क्‍यू-स्वीच एन. डी. याग लेझर - आर्मीमध्ये भरतीसाठी अंगावर कोणत्याही प्रकारचे गोंदण नसणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आर्मीच्या मेडिकलमध्ये अनफिट केले जाते. हे गोंदण काढण्यासाठी या लेझरचा उपयोग होतो. 

हेअर ट्रान्सप्लांट, अनालिसिस, पी. आर. पी, मेझो-थेरेपी उपचार -  तारुण्यात टक्कल पडल्यामुळे तरुणांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम पडतो. खूप प्रमाणात टक्कल असल्यास औषधांनी हवा तसा प्रभाव पडत नाही; या वेळी हेअर ट्रान्सप्लांट करावे लागते. पी. आर. पी. व मेझोथेरेपीमुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांना ताकद मिळते. 
कोड - हा एक त्वचारोग कमी आणि सामाजिक समस्या जास्त आहे. कोडावर उपचारासाठी एकझाइमर लेझर वापरण्यात येते. स्कीन ग्राफ्ट, पंच ग्राफ्ट, नॉन-कल्चर मेलानोसाईट ट्रान्स्फर हे कोडाच्या उपचारासाठी केले जाणारे सर्जरीचे प्रकार आहेत. काही वेळेस सर्जरी करून एकझाइमर लेझरचा वापरही केला जातो. ओठांवर, हाडांवरच्या त्वचेवर, तळहात, तळपाय या जागांवरचा कोड उपचारासाठी अवघड असतो. यासाठी नॉन कल्चर्ड मेलानोसाईट ट्रान्स्फर ही शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. 

पुवा/युव्ही बी फोटोथेरेपी - अंगभर कोड, सोरायसिस असल्यास या उपचाराचा वापर होतो. 
अंगावरील चामखीळ, तीळ, वोर्ट, जन्मखुणा, मस्से आदी प्रकारच्या आजारांसाठी अमेरिकन एल्मान मशिन वापरण्यात येते. या मशिनची विशेषतः ही की नॉर्मल त्वचेला कमीत कमी थर्मल डॅमेज होऊन डाग पडत नाहीत. 
डेर्मोस्कोपीच्या साह्याने स्कीन कॅन्सर, त्वचेचे विविध आजार, केसांच्या समस्या व आजार यांचे निदान करण्यात येते. या मशिनमुळे बायोप्सीची गरज कमी झाली आहे. त्याचबरोबर डोळ्याने न दिसणारे बदल फोटोला 200 पटीने झूम करून बघता येतात. 
बोटॉक्‍स, फिलर उपचार : वयोमनाने चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या यांचा उपचार बोटॉक्‍सने केला जातो. डोळ्याखाली असलेले डाग, शिथिल पडलेली त्वचा यासाठी फिलर उपचार केला जातो. 
पील - केमिकल पीलद्वारे त्वचेवरचा मेलेल्या पेशींचा थर, त्वचेवर लागलेली धूळ, डेड सेल्स्‌, घामाचे थर, तेलकटपणा दूर आणि स्वच्छ होतो. पिंपल्स, पिंपल्सचे डाग, गोवरचे डाग, वांग, टैनिंग, ग्लो यासाठी विविध पिलचा वापर केला जातो. 

डेर्मासर्जरी - त्वचेवर असलेले मोठे तीळ, जन्मखुणा, कोडचे चट्टे, कानाची फाटलेली पाळी, अंगावरच्या चरबीच्या गाठी, डोळ्याभोवती आलेल्या चरबीच्या गाठी, तळपायावर आणि हातावर आलेले कॉर्न, खराब झालेले नख काढणे, स्कीन कॅन्सर, मोठे जाड चामखीळ, जन्मापासून असेलेली चाई, काही विशिष्ट आजारांच्या निदानासाठी लागणारी बायोप्सी व अंगावर असलेले विविध प्रकारच्या गाठी या सर्व आजारांसाठी शस्त्रक्रिया/कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्या जातात. लग्न, घरात कार्यक्रम, पार्टी असल्यास चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी खास एकू-जेल उपचार केले जातात. 
पी. आर. पी. हा उपचार केसांचे आजार, फेशिअल ग्लो, बरे न होणाऱ्या जखमा यासाठी केला जातो.  डर्मा रोलर हे उथळ असलेले खड्डे, लाईन्स, रिंकल्स यासाठी केला जातो.  विविध केमिकल, साबण, रब्बर, हेअर डाय, मेहंदी आदीच्या संपर्कामुळे होणाऱ्या ऍलर्जीचे निदान उपचार व ऍलर्जी टेस्टिंगची सोय उपलब्ध आहे.  छातीवर किंवा इतर भागावर आलेले किलॉइड सर्जरी आणि लेझरद्वारे उपचार केला जातो. 

बऱ्याचदा आजाराचा उपचार होतो, या अनभिज्ञतेमुळे रुग्ण उपचार घेत नाहीत. काळानुसार टेक्‍नॉलॉजीमध्ये फरक पडला आहे आणि आजार ठीक करणे सोपे होत आहे. नेहमी त्वचारोग तज्ज्ञांकडूनच उपचार घ्यावा. मित्रांनी किंवा नातेवाईकांकडून क्रीम मलम घेऊन वापरू नये. स्टिरॉइड असलेले क्रीम नेहमी त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरावा. रुग्णात असा गैरसमज आहे की लेझर उपचाराने डाग पडतात व कॅन्सर होऊ शकतो. ही समज चुकीची असून योग्य सल्ल्याने उपचार केल्यास व सांगितलेल्या सूचना पाळल्यास कसलेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. 
 

त्वचा ही शरीरासाठीच नव्हे तर व्यक्तिमत्त्वासाठीही खूप महत्त्वाची आहे. चांगली निरोगी त्वचा ही आकर्षक असते. त्यामुळे व्यक्तीला आत्मविश्‍वास येतो. चांगले केस, चांगली त्वचा ही काळाची गरज झाली आहे. शरीर त्वचेमार्फत तापमान नियमन ही महत्त्वाची क्रिया पार पाडते, त्याचबरोबर वातावरणातील जंतू, घाणही शरीराबाहेर ठेवण्याचे काम त्वचा करते. शरीरात आजार झाला तर त्याचे प्रतिबिंब त्वचेवर लगेचच दिसून येते, असे म्हणतात ते खरंच आहे.  - डॉ. आदित्य महाजन, त्वचारोग तज्ज्ञ, सातारा 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News