मोलकालमुरु साडीचा उपयोग करुन बनवले जातात आधुनिक ड्रेसेस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 May 2019

इचलकरंजी :- येथील ‘डीकेटीई’मधील अंतिम वर्ष फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा उपयोग करून भारतीय व पाश्‍चिमात्य पद्धतीचा मेळ घालत आधुनिक ड्रेसेस तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नावीन्यपूर्ण पारंपरिक व आधुनिक डिझाईनचे ड्रेसेस विकसित होत आहेत.

इचलकरंजी :- येथील ‘डीकेटीई’मधील अंतिम वर्ष फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा उपयोग करून भारतीय व पाश्‍चिमात्य पद्धतीचा मेळ घालत आधुनिक ड्रेसेस तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नावीन्यपूर्ण पारंपरिक व आधुनिक डिझाईनचे ड्रेसेस विकसित होत आहेत.

सध्याची तरुणाईला इंडोवेस्टर्न कपड्यांची भुरळ पडली आहे. इंडोवेस्टर्न कपड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये पारंपरिक मोलकालमुरु सिल्क साडीचा वापर करून नवनवीन आधुनिक वस्त्र प्रावरणांचे कलेक्‍शन तयार केले आहे. या कलेक्‍शनमध्ये क्रॉप टॉप विथ पलाजो, जंप सूट विथ केप, वनसाईडेट रुफेल्स टॉप, वन पीस विथ बॉक्‍स प्लीट असे लेडीज विअर आणि वेस्टर्न मेन्स कुर्ता असे ५ ड्रेस तयार केले आहेत.

हा प्रकल्प हॅंडलूम कापडावर आधारित असल्यामुळे हॅंडलूम उद्यागाला ऊर्जितावस्था मिळालेली आहे. यातून अनेक हातांना काम मिळणार आहे. त्याचबरोबर हॅंडलूम इंडस्ट्रीज आधुनिक कपड्यांच्या बाजारपेठेत प्रवेश करेल. सिल्कला त्याच्या सुंदर दिसण्यामुळे कपड्यांची राणी असे संबोधले जाते. 

मोलकालमुरु सिल्कचा अजूनपर्यंत साडी शिवाय अन्य वापर झालेला नाही. आजकाल इंडोवेस्टर्न कपडे वापरणे सर्वजण पसंत करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ‘डीकेटीई’तील शिवतेज गस्ती, एकता बडवे, पूर्वा सोलकण पाटील, निकिता झरकर व मंजुश्री काळे या विद्यार्थ्यांनी प्रा. एल. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोलकालमुरू सिल्क साडीची निवड केली. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील व विभागातील सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News