पुन्हा एकदा हिमांशू सुर्वे फार्मात, असा हा मॉडेलिंगचा उगवता तारा

श्रृती वाघाटे (यिनबझ)
Monday, 29 April 2019

नवेनगर सारख्या खेडे भागातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या हिमांशू सुर्वे याने आज स्वत:च्या करिअरला मेहनतीने चार चांद लावले आहेत. आज पुन्हा एकदा त्या 'फॅशन शो'मध्ये बाजी मारली आहे.

'ए फॅशन हब' मार्फत आयोजित केलेल्या 'मिस्टर, मिस अँड मिसेस वेस्ट इंडिया 2019' स्पर्धेमध्ये त्याने बेस्ट फिजीक्सचा पुरस्कार मिळवला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून तब्बल 700 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 

गेल्या काही वर्षांपासून हिमांशू मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपले यशस्वीरित्या प्रयत्न करत आहे. त्याने अजूनपर्यंत विविध स्पर्धेत सहभाग नोदंवला आहे. काही महिन्यापूर्वीच लोकम प्रायोजक आणि अविका एंटरटेनमेंट आयोजित 'मिस्टर, मिस अँड मिसेस फॅशन आयकॉन' या स्पर्धेतून त्याला दुसरा रनरअप पुरस्कृत केले आहे. 

हिमांशूने लहानपणापासून शिक्षणाबरोबर काहीतरी वेगळं करण्याची जिद्द बाळगली होती. त्याने ढोलताशा पथक, फोटोग्राफी, रायगड प्रदक्षिणा, व्यायाम असे विविध छंद जोपासले आहेत. 

या स्पर्धेमध्ये  हिमांशूने केलेल्या कामगिरीबद्दल महाड बुरुड समाजाचे अधिकारी संजय मोरे, शेखर सावंत, संजेश साळुंखे आदींनी त्याचे अभिनंदन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News