बापरे..! मॉडेलने चक्क डोळ्यात काढला टॅटू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

डोळ्यांना टॅटू काढल्याने तिचा एक डोळा निकामी झाला आहे. तर दुसऱ्या देखील डोळ्याची दृष्टी लवकरच जाणार असल्याचं डॉक्टरांनी कळवलं आहे. 

सध्या तरुणांमध्ये टॅटू काढण्याची क्रेझ वाढतेय. इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी हा अट्टहास असतो. पोलंडमध्ये राहणाऱ्या एका मॉडेलने टॅटू काढून चक्क आपल्या डोळ्याची दृष्टी गमावली आहे. अ‍ॅलेक्झँड्रा सॅडोस्का असं या तरुणीचं नाव असून तिने डोळ्यांना टॅटू काढला आहे. हा टॅटू डोळ्यात काढल्याने तिच्या डोळ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. 

डोळ्यांना टॅटू काढल्याने तिचा एक डोळा निकामी झाला आहे. तर दुसऱ्या देखील डोळ्याची दृष्टी लवकरच जाणार असल्याचं डॉक्टरांनी कळवलं आहे. अ‍ॅलेक्झँड्रा हिला रॅप आर्टिस्ट पोपेकसारखे डोळ्यांना टॅटू काढायचा होता. यासाठी ती ओळखीच्या टॅटू आर्टिस्टकडे गेली आणि तेथून टॅटू काढून घेतला. हा टॅटू आयबॉलला काढण्यात येतो. हा टॅटू काढणे म्हणजे शरीरातील एखादा भाग बदलाचा अंतिम टप्पा आहे. यामध्ये डोळ्यातील पांढऱ्या भागाचा रंग बदलण्यात येतो. या भागाला डाय करून वेगळा रंग दिला जातो. 

 

या टॅटूचा गंभीर परिणाम तिच्या डोळ्यावर झाला. यामुळे तिच्या डोळ्यात वेदना होत असल्याचं सांगितले. मात्र या वेदना सामान्य असल्याचे या टॅटू आर्टिस्टने सांगितले. पेनकिलर खाल्यावर हे दुखणं दूर होईल असं देखील त्याने सांगितलं. मात्र तसे झाले नाही. अति त्रास होत असल्याने ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांच्या तापरसणीत समोर आले की, डोळ्यांमध्ये हा टॅटू काढण्यासाठी बॉडी इंकचा वापर करण्यात आला. या इंकचा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. 

या टॅटू आर्टिस्टला अटक करून ३ वर्षांच्या  कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. आपली गेलेली दृष्टी परत आणण्यासाठी अ‍ॅलेक्झँड्राने अनेकदा प्रयत्न केले. मात्र डॉक्टरांच्या माहितीनुसार, तिची दृष्टी पुन्हा येणं अवघड आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News