तरुणांनो, झोपेतून उठल्यावर मोबाईल हातात घेत असाल तर सावधान..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 September 2019
  • त्यामुळे माणूस हा सकाळी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ब्रश न करता मोबाईल  हातात घेणे पसंत करतात.

सकाळी सकाळी उठल्यावर सामान्यतः माणसे रोजचा  दिनक्रम आटोपून  आवरून आपापल्या कामाला निघून जातात. परंतु जगण्यासाठी माणूस अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टींवर अवलंबून असतो. तसेच आजकाल माणसाला मोबाईल फोनची सवय झाली आहे. त्यामुळे माणूस हा सकाळी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ब्रश न करता मोबाईल  हातात घेणे पसंत करतात. परंतु त्यांच्या ह्या सवाई पुढील  आयुष्यात घातक ठरतात. 

सकाळी सकाळी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप ह्यांचे नोटिफिकेशन पाहिल्यावर आपण दिवसभर त्याच विषयाचा विचार करतो, याने तुमचे मन अस्थिर राहते. सातत्याने एकाच विषयाचा विचार करत राहिला तर आपल्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. 

झोपेतून उठल्यावर मोबाईलचा वापर केला तर आपल्या डोळ्यांना त्याचा त्रास होतो. मोबाईल  मधून बाहेर पडणारे रेडिएशनने डोळ्यांची दृष्टी कमजोर होते. 
तज्ज्ञांच्या मते सकाळी उठल्याक्षणी फोनचा वापर करण्याऐवजी आजच्या तरुणाईने योग आणि व्यायाम  करणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते. 
 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News